वाहनातून ७.९ कोटींच्या बनावट नोटा घेऊन जात होतं त्रिकुट, पोलीस तपासादरम्यान पकडले 

By पूनम अपराज | Published: March 3, 2021 01:53 PM2021-03-03T13:53:08+5:302021-03-03T13:59:16+5:30

The trio was carrying fake Rs 7.9 crore notes from the vehicle : फोर्ड कारमध्ये तीन आरोपी मोठ्या प्रमाणात बनावट नोटा तीन बॅगमध्ये भरून घेऊन जात होते. 

The trio was carrying fake Rs 7.9 crore notes from the vehicle when police caught them during the investigation | वाहनातून ७.९ कोटींच्या बनावट नोटा घेऊन जात होतं त्रिकुट, पोलीस तपासादरम्यान पकडले 

वाहनातून ७.९ कोटींच्या बनावट नोटा घेऊन जात होतं त्रिकुट, पोलीस तपासादरम्यान पकडले 

Next
ठळक मुद्देसुन्की पोस्टवरील तपासणी दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. कोरापुट एसपी यांनी ही माहिती दिली आहे.एका कारमध्ये ठेवलेल्या बॅगमध्ये पोलिसांनी सुमारे ७ कोटी ९० लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

रायपूर: ओडिशा पोलिसांना तपासणी दरम्यान मोठे यश मिळाले आहे. एका कारमध्ये ठेवलेल्या बॅगमध्ये पोलिसांनी सुमारे ७ कोटी ९० लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या नोटा जगदलपूर-रायपूर येथून विशाखापट्टणम येथे नेत असताना पोलिसांनी बस्तरला लागून असलेल्या ओडिशाच्या कोरापुटमध्ये तिघांना ताब्यात घेतले. फोर्ड कारमध्ये तीन आरोपी मोठ्या प्रमाणात बनावट नोटा तीन बॅगमध्ये भरून घेऊन जात होते. 

 

Image


या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे सर्व जांजगीर चंपा येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. सुन्की पोस्टवरील तपासणी दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. कोरापुट एसपी यांनी ही माहिती दिली आहे.

 

Web Title: The trio was carrying fake Rs 7.9 crore notes from the vehicle when police caught them during the investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.