लाचखोरी प्रकरणी एसीबीने अटक केलेल्या एसीपी सुजाता पाटील यांची विशेष न्यायालयाने जामिनावर सुटका केली. वकील नितीन सातपुते यांनी सुजाता पाटील यांची बाजू मांडत जोरदार युक्तिवाद केला. न्यायालयाला खात्री पटल्यानंतर ACP सुजाता पाटील यांना जामीन मिळाला.
जामिनावर सुटल्यानंतर सुजाता पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट करून संताप व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सत्याची बाजू घेऊन लढत आहे असा बनाव करणाऱ्या मीडियावाल्यांनो, माझ्यावर झालेला ट्रॅप हा धादांत फॅब्रिकेटेड आहे. हे ऐकून कोर्टाने मला त्वरित सोडलेले आहे. ते पण बेंबीच्या डेटाला ताण पडेपर्यंत सांगा. अशा संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
मेघवाडी विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुजाता पाटील यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. एसीबीने कार्यालयात सापळा रचून सुजाता पाटील यांना अटक केली होती. तक्रारदाराकडे १ लाखाची त्यांनी मागणी केली होती. ४० हजारांची लाच स्वीकारताना सुजाता पाटील यांना एसीबीच्या पथकाने अटक केली होती. मात्र, हे सर्व आरोप पाटील यांनी फेटाळून लावले आहेत.