वेशांतर करून वावरतोय दहशतवादी; फोटो जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 15:06 IST2018-12-06T15:04:47+5:302018-12-06T15:06:38+5:30
शीखांच्या वेशातील त्याचा एक फोटो गुप्तचर विभागाच्या हाती लागल्यानंतर ही माहिती देण्यात आली असून मीडियासमोर त्याचा फोटो उघड करण्यात आला आहे.

वेशांतर करून वावरतोय दहशतवादी; फोटो जारी
नवी दिल्ली - कश्मीरमधील दहशतवादी जाकिर मूसा हा वेशांतर करून संपूर्ण भारतभर फिरत असल्याची माहिती गुप्तचर संघटना, सीआयडी आणि लष्कराच्या गुप्तहेर खात्याने दिली आहे. जाकिर मुसा हा पंजाबच्या फिरोजपूर आणि भटिंडा परिसरात शीखांच्या वेशात लपला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शीखांच्या वेशातील त्याचा एक फोटो गुप्तचर विभागाच्या हाती लागल्यानंतर ही माहिती देण्यात आली असून मीडियासमोर त्याचा फोटो उघड करण्यात आला आहे.
दरम्यान, हा फोटो जारी केल्यानंतर फिरोजपूर आणि भटिंडामध्ये हायअलर्ट आहे. जाकिर मुसा हा अल-कायदाचा कमांडर आहे. काही दिवसांपासून तो कश्मीरमधून बाहेर पडण्याची माहिती गुप्तचर संघटनांना मिळाली होती. तो राजस्थान किंवा पंजाबमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. या अगोदर देखील मुसा 7 अन्य साथीदारांसोबत पंजाबमध्ये घुसला होता. काही दिवसांपूर्वी तो अमृतसरमध्ये देखील दिसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अमली पदार्थाचा व्यापार करणाऱ्यांवर छापे मारत आहे. ते दहशतवाद्यांच्या संपर्कात असण्याची शक्यता पोलिसांना वाटत आहे.