नागपुरात भरधाव वाहनाच्या धडकेत स्प्लेंडरचालकाचा करुण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 20:12 IST2020-02-28T20:11:37+5:302020-02-28T20:12:21+5:30
गावाकडे जात असलेल्या दुचाकीचालकाला भरधाव वाहनचालकाने जोरदार धडक मारल्याने त्याचा करुण अंत झाला. गुरुवारी रात्री वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला.

नागपुरात भरधाव वाहनाच्या धडकेत स्प्लेंडरचालकाचा करुण अंत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गावाकडे जात असलेल्या दुचाकीचालकाला भरधाव वाहनचालकाने जोरदार धडक मारल्याने त्याचा करुण अंत झाला. कैलास तुकाराम गजभिये (वय ३९) असे मृताचे नाव आहे. ते उमरेड तालुक्यातील नवेगाव येथील रहिवासी होते. गुरुवारी रात्री वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला.
गजभिये त्यांच्या स्प्लेंडर मोटरसायकलने सिवनी येथून त्यांच्या गावाकडे जात होते. गुरुवारी रात्री ९.४५ ते १०. ३० च्या सुमारास जबलपूर- हैदराबाद महामार्गावरील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या दुचाकीला भरधाव वाहनचालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे गजभिये गंभीर जखमी झाले. त्यांना मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. रामू तुकाराम गजभिये (वय ४३) यांनी नोंदविलेल्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी आरोपी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.