शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिस अधिकाऱ्याचे दुचाकीस्वाराने दगडाने फोडलं डोकं; कारवाईच्या रागातून घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 20:53 IST

Beaten to Traffic police officer in kalyan : वाहतूक पोलिसांकडून सकाळी आणि संध्याकाळी शहरातील मुख्य चौकांमध्ये नाकाबंदीची कारवाई सुरू आहे.

ठळक मुद्देपटाईत यांच्यावर केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात उपचार सुरू असून राहुलला अन्य वाहतूक पोलिस कर्मचा-यांनी पकडून महात्मा फुले चौक पोलिसांच्या ताब्यात दिले.

कल्याण:  कल्याण वाहतूक पोलिसांकडून शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान शहाड पूलाच्या ठिकाणी नाकाबंदीची कारवाई सुरू असताना राहुल रोकडे या दुचाकीस्वाराने कारवाई केल्याच्या रागातून सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक प्रकाश पटाईत यांच्या डोक्यात दगड मारुन त्यांना जखमी केल्याचा प्रकार घडला. पटाईत यांच्यावर केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात उपचार सुरू असून राहुलला अन्य वाहतूक पोलिस कर्मचा-यांनी पकडून महात्मा फुले चौक पोलिसांच्या ताब्यात दिले.

वाहतूक पोलिसांकडून सकाळी आणि संध्याकाळी शहरातील मुख्य चौकांमध्ये नाकाबंदीची कारवाई सुरू आहे. यात हेल्मेट न घालणो, सिटबेल्ट न लावणो, रिक्षा चालकांनी गणवेश आणि बॅच परिधान न करणो याबाबत कारवाई केली जात आहे. संध्याकाळी सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक प्रकाश पटाईत हे दोन हवालदारांसह शहाड पूलाच्या परिसरात कारवाई करीत होते. त्यावेळी भरधाव वेगात दुचाकी चालविणा-या राहुलला त्यांनी हटकले. परंतू राहूलने दुचाकी थांबवली नाही तो अधिक वेगाने दुचाकी पळवू लागला. पटाईत आणि दोन हवालदारांनी त्याचा पाठलाग केला.

काही अंतरावर त्याला अडविण्यात आले. दुचाकी अडविल्याचा राहुलला राग आला आणि त्याने रस्त्याच्या बाजुला असलेल्या दगडाने पटाईत यांच्या डोक्यावर प्रहार केला. यात पटाईत जखमी झाले तर राहुलला दोन्ही हवालदारांनी पकडून महात्मा फुले पोलिसांच्या हवाली केले. राहुल हा धाकटे शहाड परिसरातील राहणारा आहे अशी माहीती वाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक सुखदेव पाटील यांनी दिली.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीkalyanकल्याणPoliceपोलिसtwo wheelerटू व्हीलर