शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खर्डीत रेल्वे अपघातात ट्रॅकमनचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 19:30 IST

ही घटना आज दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घडली.

ठळक मुद्देदोन रेल्वे गाड्यांच्या मधोमध अडकून गोंधळ झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.काही वर्षांपूर्वी कल्याण स्थानकात पत्रीपूलादरम्यान चार गँगमनचा अपघाती मृत्यू झाला होता.

डोंबिवली - मध्य रेल्वेचे ट्रॅकमन (चावीवाला) जोगेश्वर प्रजापती, ५५, कोळसेवाडी, कल्याण पूर्व येथे राहणारे यांचा रेल्वेअपघातातमृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घडली. दोन रेल्वे गाड्यांच्या मधोमध अडकून गोंधळ झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.उपनगरिय रेल्वे प्रवासी प्रवासी एकता संस्थेचे पदाधिकारी राजेश घनघाव यांनी दिलेल्या माहितीनूसार खर्डी स्थानकादरम्यान अप मार्गावर ही घटना घडली. प्रजापती हे कार्यरत असतांना दोन्ही दिशांकडून रेल्वे गाड्या आल्या. त्या दरम्यान गोंधळून गेलेल्या प्रजापती यांचा अप दिशेकडील रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याने त्यांना दिली. तसेच काही प्रत्यक्षदर्शींनी हा अपघात झाल्याचे त्यांना सांगितले होते. त्यानूसार त्यांनी माहिती घेतली असता रेल्वे कर्मचा-याचा अपघात झाल्याचे त्यांना समजले.काही वर्षांपूर्वी कल्याण स्थानकात पत्रीपूलादरम्यान चार गँगमनचा अपघाती मृत्यू झाला होता. त्या वेळीही गँगमन, ट्रॅकमनच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. पण तरीही रेल्वे प्रशासनाने काळजी घेतलेली नसल्यानेच त्या विभागातील कर्मचा-यांचे अपघात सत्र सुरुच असल्याचे घनघाव म्हणाले. त्याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूrailwayरेल्वे