दोन वर्षाच्या मुलीला वेगळे ठेवून पत्नीचा छळ, पतीसह पाच जणांवर गुन्हा

By दिपक दुपारगुडे | Updated: July 11, 2023 15:09 IST2023-07-11T15:09:18+5:302023-07-11T15:09:29+5:30

फिर्यादी प्रियंका यांचे तुकाराम शिवराम कांबळे याच्याशी विवाह झाला होता.

Torture of wife by keeping two-year-old daughter apart, crime against five people including husband | दोन वर्षाच्या मुलीला वेगळे ठेवून पत्नीचा छळ, पतीसह पाच जणांवर गुन्हा

दोन वर्षाच्या मुलीला वेगळे ठेवून पत्नीचा छळ, पतीसह पाच जणांवर गुन्हा

सोलापूर : पैशासाठी पत्नीचा छळ करत दोन वर्षाच्या मुलीला फिर्यादीपासून वेगळे ठेवत तिचा छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर सलगरवस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत प्रियंका तुकाराम कांबळे ( वय २३, रा. थांबडे वस्ती, जुना देगाव नाका) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी प्रियंका यांचे तुकाराम शिवराम कांबळे याच्याशी विवाह झाला होता. त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी भडकावून माहेरून पैसे आण असे सांगत होते. तसेच आरोपी तुकाराम हा त्यांना मारहाण करत त्यांना अपमानास्पद वागणूक देत होता, अशा आशयाची फिर्याद प्रियंका कांबळे यांनी दिली आहे. 

या फिर्यादीवरून पती तुकाराम कांबळे, सासू लक्ष्मी कांबळे, दीर संतोष कांबळे, जाऊ सीमा कांबळे, नणंद सोनाली सुरेश सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास हवालदार गायकवाड करत आहेत.
 

Web Title: Torture of wife by keeping two-year-old daughter apart, crime against five people including husband