शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
2
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
3
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
4
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
5
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
6
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
7
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
8
नवीन वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा! 'या' आहेत श्रीमंत करणाऱ्या टॉप ५ योजना; सुरक्षा आणि दमदार परतावा
9
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
10
Vijay Hazare Trophy : कोण आहे Devendra Bora? ज्याच्यासमोर हिटमॅन रोहित 'गोल्डन डक'सह ठरला फ्लॉप
11
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
12
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
13
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
14
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
15
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
16
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
17
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
18
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
19
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
20
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
Daily Top 2Weekly Top 5

एकेकाळी गुंडांचा कर्दनकाळ ठरलेले टॉप 'एन्काउंटर स्पेशालिस्ट'

By पूनम अपराज | Updated: September 20, 2019 20:02 IST

मुंबईत या अधिकाऱ्यांना एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखलं जातं. यापैकी काही एन्काउंटर स्पेशालिस्ट वादाच्या भोवऱ्यात देखील अडकले.

ठळक मुद्दे२६/११ मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्‍ल्‍यात शहीद झालेले एन्‍काउंटर स्पेशलिस्ट विजय साळसकरमालमत्तेच्या प्रकरणात अडकून दया नाईक यांना पोलीस दलातून निलंबन करण्यात आले होते. शर्मा यांनी आपला मोर्चा आता राजकारणाकडे वळवला आहे.

मुंबईसारख्या मायानगरीत एकेकाळी गॅंगवॉरसारख्या गुन्हेगारीने डोकं वर काढलेलं असताना या टोळ्यांनी थैमान घातल्याने मुंबईकर हैराण झाले होते. पोलिसांसाठी देखील या टोळ्या मोठ्या डोकेदुखी ठरल्या आहेत. मात्र, पोलीस दलातील काही धडाकेबाज अधिकाऱ्यांनी या गुंडांचा एन्काउंटर करत गुन्हेगारी टोळ्याचं वर्चस्व ठेचून काढलं. गुुंडांचा कर्दनकाळ म्हणून 'या' काही अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. नव्वदीच्या दशकातील अनेक नामचीन गुंडाचा खात्मा या पोलीस अधिकाऱ्यांनी करत मुंबईत कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणू दिली नाही. मुंबईत या अधिकाऱ्यांना एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखलं जातं. यापैकी काही एन्काउंटर स्पेशालिस्ट वादाच्या भोवऱ्यात देखील अडकले.

प्रदीप शर्मामूळचे उत्तरप्रदेश येथील आग्राचे असलेले प्रदीप शर्मा. १९८३ सालच्या बॅचचे अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलीस दलात शर्मा यांनी पोलीस उपनिरीक्षक म्हणून प्रवेश केला. शर्मा यांच्या कारकिर्दीला खरी धार चढली ती युतीच्या काळात. नव्वदीच्या दशकात डी कंपनी आणि इतर टोळ्यांमधील चकमकी (गॅंगवॉर) दिवसाढवळ्या होत होत्या. या गुंडांना आवर घालणं कठिण होऊन बसलं होतं. तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी शहीद विजय साळसकर आणि प्रदीप शर्मा यांना गुन्हेगारी टोळ्या नामशेष करण्याचे आदेश दिले. त्यावेळी शर्मा यांनी तब्बल ११२ गँगस्टरचा खात्मा केला. शर्मा यांच्या नावाने अनेक गुन्हेगारांचा थरकाप उडायचा. मात्र, लखनभैय्या  एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मा यांना अटक झाली आणि त्यांचे निलंबन करण्यात आलं होतं. मात्र, ९ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर त्यांना न्यायालयाने सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केले. प्रदीर्घ काळानंतर सेवेत पुन्हा रूजू झालेल्या शर्मा यांची पकड आता कमी झाली असल्याचं बोलले जात असताना शर्मा यांनी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला खंडणीच्या गुन्ह्यात अटक करून दमदार कमबॅक ककेली. निलंबनानंतर पोलीस सेवेत आल्यानंतर त्यांचं मन फारसं रमलं नाही. त्यामुळेच शर्मा यांनी आपला मोर्चा आता राजकारणाकडे वळवला आहे. शर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून ते नालासोपारा येथून निवडणूक लढवणार असून ठाकूराच्या वर्चस्वाला शह देणार असल्याची चर्चा आहे.  प्रदीप शर्मांची ओळख एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी झाली ते सुभाष माकडवाला या गँगस्टरशी झालेल्या चकचकीमुळे. एके 56 ही त्यावेळची अत्याधुनिक रायफल बाळगणाऱ्या सुभाष माकडवाला याला प्रदीप शर्मांनी हातातल्या साध्याशा कार्बाइननं मारलं. 

रविंद्रनाथ आंग्रेपोलीस सेवेत असताना रविंद्रनाथ आंग्रे हे नेहमी चर्चेत राहिले. ठाण्यासह मुंबईत ते गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ म्हणूनच ओळखले जातं. मुंबईसह ठाण्यातील गुंडांच्या मुसक्या आवळत आंग्रे यांनी आतापर्यंत ५३ गुंडांचे एन्काउंटर केले आहे. त्यापैकी मुंबईत ३३ तर ठाण्यात २१ गुंडांचा त्यांनी खात्मा केला. नवी मुंबई, डोंबिवली आणि अंबरनाथ परिसरात दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुंड सुरेश मंचेकर गॅंगच्या मुसक्या आवळण्याचं काम आंग्रे यांनी केलं. तसेच ठाणे-भिवंडी परिसरात असताना त्या भागातील कुख्यात गुन्हेगारांचे आंग्रे यांनी कंबरडे मोडले. मात्र, नंतर आंग्रे यांना त्यांची एन्काउंटर स्पेशलिस्ट ही इमेज फारसी फळली नाही. फेब्रुवारी २००८ मध्ये ठाण्यातील एका विकासकाला खंडणीसाठी धमकवल्याप्रकरणी तर २०१० मध्ये एका व्यक्तीवर गोळीबार प्रकरणात आंग्रे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. या गुन्ह्यात आंग्रे यांना १४ महिने तुरुंगात रहावे लागले. आंग्रे यांची सबळ पुराव्यांअभावी सर्व आरोपातून मुक्तता करत त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले. खाकीला डाग लागल्यानंतर आंग्रे यांनी पोलीस सेवेतून निवृत्ती घेत भाजपा पक्षामध्ये प्रवेश केला. नंतर भाजपाला रामराम करत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.  

प्रफुल्ल भोसलेमुंबई पोलीस दलात १९८७ साली दाखल झालेले प्रफुल्ल भोसले हे पूर्वी सिटी बँकेत क्लर्क म्हणून कामाला होते. ९० च्या दशकात प्रफुल्ल भोसले यांच्या नावाचा गुन्हेगारांवर मोठा धाक होता. भोसले यांनी नाईक गँग, अरूण गवळी गँग, छोटा शकील गँगच्या ८७ कुख्यात गुंडाचे एन्काउंटर केले. पण, घाटकोपर बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी ख्वाजा युनुसच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरण भोसले यांना भोवले होते. २००३ साली घाटकोपर क्राइम ब्रँचमध्ये काम करत असताना ख्वाजा युनुसला तेथील कोठडीत ठेवण्यात आले होते. त्याच्याकडून बॉम्बस्फोटाच्या कटाची माहिती घेण्यासाठी या चौघांनी थर्ड डिग्रीचा अर्थात ख्वाजाला बेदम मारल्याचा आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला होता. मात्र, याबाबत काहीही पुरावा नसल्याचे प्रतिज्ञापत्रक सीआयडीने कोर्टात दाखल केले असल्याची माहिती मिळत आहे.

सचिन वाजेसचिन वाजे हे देखील मुंबई पोलिसा दलातील एन्‍काउंटर स्पेशलिस्ट म्हणून नाव प्रसिद्ध. त्‍यांनी कुख्यात गुंड छोटा राजन आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्‍या अनेक साथीदारांचा एन्‍काउंटर केला आहे. यांच्‍यावरही प्रफ्फुल भोसलेंसोबत ख्वाजा युनूसला पोलीस कोठडीत मारल्‍याचा ठपका ठेवण्यात आला आहे. वाजे यांचे पोलीस निरीक्षक असताना एका बनावट एन्‍काउंटर प्रकरणात त्‍यांना निलंबित करण्‍यात आलं होतं. त्‍यानंतर २००७ मध्‍ये त्‍यांनी नोकरी सोडली. त्यानंतर शिवसेनेचा धनुष्यबाण हातात पकडून ते राजकारणात सक्रिय झाले होते.

दया नाईकनव्वदीच्या दशकातील ८३ गुंडांना यमसदनी धाडून गुन्हेगारी जगतात दया नाईक यांनी दबदबा निर्माण केला होता. मात्र, कालांतराने बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात अडकून दया नाईक यांना पोलीस दलातून निलंबन करण्यात आले होते. १९९५  सालच्या तुकडीतील डॅशिंग व्यक्तिमत्व असलेल्या नायक यांनी अल्पावधीतच ‘चकमक’फेम अशी आपली ओळख निर्माण केली. मात्र, कर्नाटक येथे आपल्या आईच्या नावे बांधलेल्या शाळेचे २००६ मध्ये सुप्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते उद्घाटन करणं त्यांच्या अंगाशी आलं. एका पोलीस अधिकाऱ्याकडे शाळा बांधण्यासाठी एवढे पैसे आले कुठून? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचा (एसीबी) ससेमिरा त्यांच्यामागे लागला. गुंडांचा कर्दनकाळ अशी ओळख बनविलेल्या नायक यांना बेहिशेबी मालमत्तेच्या वादाने नाउमेद झाले. या प्रकरणी त्याच्यावर अटकेची कारवाई होऊन मुंबई पोलीस सेवेतून त्यांना निलंबित करण्यात आले. जामिनावर सुटल्यानंतर तर ते अज्ञातवासात गेले होते. अलीकडेच काही वर्षांपूर्वी ते पुन्हा पोलीस खात्यात रुजू झाले.

विजय साळसकर२६/११ मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्‍ल्‍यात शहीद झालेले एन्‍काउंटर स्पेशलिस्ट विजय साळसकर यांनी कुख्यात गुंड अरुण गवळी गँग नामशेष केली होती. त्‍यांनी गँगस्टर अमर नाईक आणि सदा पावले यांना अटक केली होती. त्‍यामुळे ते चर्चेत आले होते. दरम्‍यान, एक एन्‍काउंटर करताना एका १८ वर्षीय मुलाला गोळी लागून त्‍याचा मृत्‍यू झाला. त्‍यामुळे ते वादात अडकले होते. माजी मुंबई पोलीस आयुक्‍त राकेश मारिया यांचे ते सर्वात आवडीचे अधिकारी होते असे म्हणतात. 

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईLakhan Bhaiya Encounterलखनभैय्याsuspensionनिलंबन