घरात एकटी असल्याचा घेतला फायदा; १५ वर्षीय मुलीवर गावातल्याच युवकाने केला अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 16:02 IST2021-09-27T14:29:41+5:302021-09-27T16:02:37+5:30

अमरावतीमधील घटना

Took advantage of being alone at home; A 15-year-old girl was tortured by a youth from the village in amravati | घरात एकटी असल्याचा घेतला फायदा; १५ वर्षीय मुलीवर गावातल्याच युवकाने केला अत्याचार

घरात एकटी असल्याचा घेतला फायदा; १५ वर्षीय मुलीवर गावातल्याच युवकाने केला अत्याचार

अमरावती: परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १५ वर्षीय मुलीवर गावातीलच २२ वर्षीय युवकाने घरात शिरून अत्याचार केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

अत्याचाराची ही घटना ४ सप्टेंबरला घडली. प्रकरणातील फिर्यादीवरून १८ सप्टेंबरला परतवाडा पोलिसांनी भादंविचे कलम ३७६ (३), ४५२, ५०६ तसेच ४ पोक्सो अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गावातील स्वत:च्या घरी ती अल्पवयीन मुलगी एकटी असताना आरोपी तिच्या घरात शिरला व तिच्यावर अत्याचार केला. 

पीडिताने आपल्या आईवडिलांना आपबीती सांगितल्यानंतर त्यांनी परतवाडा पोलीस ठाणे गाठले. परतवाडा पोलिसांनी फिर्यादीवरून १८ सप्टेंबरला आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. अचलपूर पोलिसांनी त्याला न्यायालयापुढे उभे केले. त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. पुढील तपास परतवाडा पोलीस करीत आहेत.

Web Title: Took advantage of being alone at home; A 15-year-old girl was tortured by a youth from the village in amravati