शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

खूप कंटाळलो आहे! बलात्काराचा आरोप असलेल्या पोलिसाने उचलले टोकाचे पाऊल, WhatsAppवर पाठवली सुसाईड नोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 18:50 IST

Suicide Case : देव त्यागी आणि राजेश जाट यांनीही बोलावून मला मारहाण केली. त्यांच्यामुळेच आता मी माझा जीव देत आहे. माझ्या मृत्यूला तीन पुरुष जबाबदार असून मला न्याय द्यावा, मला तीन मुली आहेत. ज्वाला शर्माला कंटाळून मी माझा जीव देत आहे, तिच्यावर कारवाई झाली पाहिजे.

पानिपत - हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील एका हेड कॉन्स्टेबलने (EHC) आत्महत्या केली आहे. पोलिसाने पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास सेक्टर 6 च्या मागे रेल्वे रुळावर ट्रेनसमोर उडी मारून आपले जीवन संपवले. रेल्वे ट्रॅकवर मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडल्याची माहिती जीआरपीला मिळाली. मृतदेहाजवळ सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे जीआरपीने मृतदेहाची ओळख पटवली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे. पोलिसाने आत्महत्या कोणत्या कारणासाठी केली याचा जीआरपी तपास करत आहे.खरं तर, जानेवारी 2022 मध्ये एका महिलेने पोलिसाविरुद्ध बलात्काराचा आरोप करत केस दाखल केली होती. प्रकरणाची नोंद झाल्यानंतर, पोलिसाला एसपींनी हजर राहण्यास सांगितले. तेव्हापासून हे प्रकरण पोलिस ठाण्यात प्रलंबित आहे. या प्रकरणात, पोलिसासोबत, त्याच्या भावावर देखील IPC च्या कलम 323, 34, 376 (2) (N), 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भावोजीने मेव्हणीला १०० फूट खोल विहिरीत ढकललं; ३६ तास साप-विंचवांच्या विळख्यात होती तरुणी

दादा, मला वाचव, 'तो' बंदूक घेऊन मागे फिरतोय अन् काही वेळातच आढळला वंशिकाचा मृतदेहहे भयंकर पाऊल उचलण्यापूर्वी, पोलीस संदीप कुमार यांनी WhatsAppवर मेसेजद्वारे त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीला सुसाईड नोट पाठवली. यासोबतच त्यांनी स्वत:चा रेल्वे ट्रॅकवर उभा असलेला फोटोही पाठवला आहे. त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, आज ज्वाला (काल्पनिक नाव) हिने मला WhatsAppवर फोन करून घरी बोलावून मारहाण केली. त्यानंतर देव त्यागी आणि राजेश जाट यांनीही बोलावून मला मारहाण केली. त्यांच्यामुळेच आता मी माझा जीव देत आहे. माझ्या मृत्यूला तीन पुरुष जबाबदार असून मला न्याय द्यावा, मला तीन मुली आहेत. ज्वाला शर्माला कंटाळून मी माझा जीव देत आहे, तिच्यावर कारवाई झाली पाहिजे.तीन मोबाईलवर आत्महत्येचा मेसेज पाठवलासंदीपने राजेश जाट आणि देव त्यागी यांचे मोबाईल नंबर पाठवताना मेसेज लिहिला की, ज्वाला शर्माला खूप कंटाळलो आहे, त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे. माझ्यासोबत या तिघांनी मिळून खूप वाईट गोष्टी केल्या, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. पानिपत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या नातेवाईकांनी आणि त्यांच्या मित्रांनी पोलिस प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे. तसेच मृत संदीपला तीन मुली असल्याचे सांगितले. त्यांच्या जाण्याने मुलींच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हिरावले असून पत्नी अस्वस्थ झाली आहे. मात्र, कुटुंबीयांच्या जबाबाच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसHaryanaहरयाणाDeathमृत्यूWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप