वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:25 IST2025-08-06T13:24:14+5:302025-08-06T13:25:24+5:30
दिल्ली पोलिसांनी एका १६ वर्षीय युवतीची सुटका केली. या प्रकरणी धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
दिल्ली पोलिसांनी एक मोठं रॅकेट शोधून काढले आहे. एका १६ वर्षीय युवतीला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते. या युवतीची सुटका केली आहे. दरम्यान, आता मुलीने याबाबत धक्कादायक माहिती पोलिसांना दिली आहे.त्या युवतीला एक वर्षापूर्वी या व्यवसायात ढकलण्यात आले. तिला दररोज रात्री ८ ते १० ग्राहकांना खूष करायचे होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांना हे एक मोठं रॅकेट असण्याचा संशय आहे. पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, युवतीला शारीरीक त्रास होऊ लागला की तिला औषध दिली जात होती. यानंतर पुन्हा तिला ग्राहकांकडे पाठवले जात होते, या कामासाठी तिला ५०० रुपये दिले जात होते. पण, हे पैसे देखील तिला कधीकधी आणि मागणीनुसारच दिले जात होते. ज्यावेळी तिने हे काम बंद करण्याची विनंती केली. त्यावेळी तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
तिच्याच मैत्रिणीने केली फसवणूक
पीडित युवतीला तिच्याच मैत्रिणीने फसवल्याचे समोर आले. तिच्या मैत्रिणीने युवतीला मोठ्या लोकांसोबत ओळख करुन देतो असं सांगितलं होतं. ही लोक पैशाची मदत करतात असंही तिने सांगितलं होतं. युवतीने एका तरुणाची ओळख करुन दिली. त्या तरुणीने भरपूर पैसा कमावण्याची मला आमिष दाखवल्याचे युवतीने सांगितले. काही दिवसांनी मला दलदलीत ढकलली जात असल्याचे लक्षात आले. मी या गोष्टी समजताच मी यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केले पण मला त्या लोकांनी माझे अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. ते मला सतत धमकी देत होते, असंही त्या युवतीने सांगितले.
वडिलांना कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाल्याचे सांगत होती....
काही वर्षापूर्वीच युवतीच्या आईचे निधन झाले होते. ती तिच्या वडिलांसोबत राहत होती, वडिलांना दारुचे व्यसन होते. युवतीने सांगितले की, मी वडिलांना कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाल्याचे सांगितले आहे. युवतीने सांगितले की ती दररोज संध्याकाळी ५ वाजता घरून निघायची आणि ग्राहकांसोबत रात्र घालवल्यानंतर ती सकाळी ५-६ वाजता परतायची.
अशी केली सुटका
बाल हक्कांच्या संरक्षण आणि सुरक्षेसाठी काम करणाऱ्या AVA या संस्थेने यामध्ये युवतीला मदत केली. वरिष्ठ संचालक मनीष शर्मा म्हणाले, 'आमची टीम ग्राहक असल्याचे भासवून टोळीपर्यंत पोहोचली. त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी आम्हाला एका महिन्यापेक्षा जास्त वेळ लागला. बरीच सौदेबाजी केल्यानंतर, आम्ही त्याला ऑनलाइन पेमेंट केले पण त्यानंतर त्याने लगेच त्याचे ठिकाण बदलले. शेवटी, त्याने आम्हाला द्वारकेला बोलावले. आम्ही ताबडतोब पश्चिम द्वारका रेंजचे डीसीपी अंकित कुमार सिंग यांना याबद्दल माहिती दिली. सिंग यांनी ताबडतोब त्यांच्या टीमला माहिती दिली आणि छाप्याची तयारी केली. यातून तिला सहीसलामत वाचवण्यात आले.