पत्नीला SMSवर बाहेरगावी चालल्याचे सांगितले; पोलिसांचा फोन आला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 10:11 PM2020-01-09T22:11:39+5:302020-01-09T22:13:50+5:30

उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Told his wife to goin out of station on SMS; Call received Police's phone ... | पत्नीला SMSवर बाहेरगावी चालल्याचे सांगितले; पोलिसांचा फोन आला अन्...

पत्नीला SMSवर बाहेरगावी चालल्याचे सांगितले; पोलिसांचा फोन आला अन्...

Next
ठळक मुद्देदोघांनी विष पिऊन आत्महत्या का केली ? याचा खुलासा तपासानंतर होईल असे पोलिसांनी सांगितले. उमाशंकर हा विवाहबाह्य संबंध असलेल्या प्रेयसी मनीषा (19) हिला घेऊन एका लॉजवर गेला.

इंदूर - पत्नीला SMS करून बाहेरगावी जात असल्याचे सांगितले. मात्र, पत्नीशी लबाडी करत प्रेयसीला घेऊन लॉजवर गेल्यानंतर रात्र घालवली. धक्कादायक बाब म्हणजे सकाळी दोघेही बेशुद्धावस्थेत आढळून आले. उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोघांनी विष पिऊन आत्महत्या का केली ? याचा खुलासा तपासानंतर होईल असे पोलिसांनी सांगितले. 

उमाशंकर विश्वकर्मा (26) याने पत्नीला SMS करून भोपाळला जात असल्याचे सांगितले. मात्र, उमाशंकर हा विवाहबाह्य संबंध असलेल्या प्रेयसी मनीषा (19) हिला घेऊन एका लॉजवर गेला. दोघांनी रात्र सोबत घालवली. दुसऱ्या दिवशी लॉजचा कर्मचारी साफसफाई करण्यासाठी गेला असता त्याला मनीषा रूमच्या गॅलरीमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आली. कर्मचाऱ्याने ताबडतोब व्यवस्थापकास कळविले. उमाशंकरही बेशुद्धावस्थेत होता. दोघांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मनीषाचा मृत्यू झाला तर तीन तासानंतर उमाशंकरचा मृत्यू झाला. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.

उमाशंकर हा देवास परिसरातील एका कंपनीमध्ये नोकरी करत होता. त्याच्या पश्चात पत्नी व पाच वर्षांचा मुलगा आहे. उमाशंकरची कंपनीमध्येच मनीषासोबत ओळख झाली होती. दोघांच्या मृत्यूबाबत कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळी कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट आढळून आलेली नाही. यामुळे दोघांनी विष पिवून का आत्महत्या केली याचा उलगडा तपासानंतर होईल असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Told his wife to goin out of station on SMS; Call received Police's phone ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.