शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रसंगी एन्काउंटर करू, शिक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 11:03 IST

कर्नाटकच्या मंत्र्यांचे वक्तव्य; मंगळुरूत आणखी एक हत्या

बंगळुरू : गुन्हेगारी संपविण्यासाठी उत्तर प्रदेशने जे धोरण राबविले, त्यापेक्षा पाच पावले पुढे जाण्याची कर्नाटकची तयारी आहे. आवश्यकता भासली तरी आम्ही गुन्हेगारांचे एन्काऊंटरही करू शकतो, असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकचे उच्च शिक्षण खात्याचे मंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी केले आहे. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राबविलेल्या धोरणाप्रमाणे पावले उचलण्याची तयारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दर्शविली होती. भाजप नेते प्रवीण नेत्तारू यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर बोम्मई यांनी हे उद्गार काढले होते. हत्येने मंगळुरू हादरले

कर्नाटकच्या मंगळुरू शहरात चेहरे झाकलेल्या हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी २३ वर्षीय युवकाची हत्या केली. मोहंमद फाजील असे या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी एका कापड दुकानासमोर ही घटना घडली. हा हल्ला सीसीटीव्हीत कैद झाला आहे. भाजपच्या युवा आघाडीचा नेता प्रवीण नेत्तार याच्या हत्येमुळे जिल्ह्यात प्रचंड तणाव असताना ही घटना घडली. फाजील हा एका कापड दुकानासमोर मोबाइलवर बोलत होता. तेव्हा हल्लेखोर कारमधून खाली उतरले व त्याच्या दिशेने धावले. त्यांचे चेहरे काळ्या कपड्याने झाकलेले होते. हल्लेखोरांनी काठ्यांसह चाकूने हल्ला केला. यात फाजीलचा मृत्यू झाला. आरोपींचा शोध सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, भाजपच्या जिल्हा युवा मोर्चाचे सदस्य प्रवीण नेत्तार (वय २२) यांची बेल्लारीतील त्यांच्या दुकानासमोर दुचाकीवर आलेल्या तीन हल्लेखोरांनी मंगळवारी रात्री हत्या केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी चार अज्ञात हल्लेखोरांनी गुरुवारी रात्री फाजील याची हत्या केली.

प्रतिबंधात्मक आदेश लागूमंगळुरूत गेल्या काही दिवसांत दोन वेगवेगळ्या समुदायाच्या दोनजणांची एकापाठोपाठ हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. कर्नाटक-केरळ सीमेलगतच्या ५५ ठिकाणांवरील सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी आपण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. दरम्यान, तणावपूर्ण वातावरणामुळे दक्षिण कन्नड आणि उडपी जिल्ह्यातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सूरतकल, बाजपे, मुल्की आणि पन्नाम्बुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळा आणि महाविद्यालये आज बंद ठेवण्यात आली.

तपास एनआयएकडेnभाजयुमाेच्या कार्यकर्त्याच्या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे देण्याची घाेषणा मुख्यमंत्री बसवराज बाेम्मई यांनी केली. प्रवीण नेत्तार यांच्या हत्येप्रकरणी पाेलिसांनी आणखी एकाला अटक केली. nयाप्रकरणाचा तपास दाेन राज्यांमध्ये पसरलेला आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे बाेम्मई यांनी सांगितले. हल्लेखाेर केरळमधून आल्याचा कर्नाटक पाेलिसांना संशय आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसministerमंत्री