भयंकर! सरकारी नोकरीसाठी लेकाने आई-वडील आणि आजीची केली हत्या; घरात सॅनिटायझरने...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 08:56 IST2023-05-19T08:49:05+5:302023-05-19T08:56:55+5:30

एका व्यक्तीने पैसे आणि नोकरीच्या लालसेपोटी आपल्या आई-वडिलांची आणि आजीची हत्या केली.

to get government job compassionate appointment son killed teacher father mother grandmother | भयंकर! सरकारी नोकरीसाठी लेकाने आई-वडील आणि आजीची केली हत्या; घरात सॅनिटायझरने...

फोटो - आजतक

छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने पैसे आणि नोकरीच्या लालसेपोटी आपल्या आई-वडिलांची आणि आजीची हत्या केली. त्यानंतर दोन दिवस मृतदेह घरी लाकूड आणि सॅनिटायझर टाकून जाळण्यात आले. तसेच त्याने वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस त्याच्या घरी पोहोचले असता घरात रक्त आढळून आलं.

पोलिसांना घरात जळालेले मानवी अवशेषही सापडले. यानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारे मृत्यू झालेल्या शिक्षकाचा मोठा मुलगा उदित याची कसून चौकशी केली. चौकशीत त्याने आई-वडील आणि आजीची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण महासमुंद जिल्ह्यातील सिघोडा पोलीस स्टेशन हद्दीतील पुटका गावाशी संबंधित आहे. शिक्षक प्रभात भोई हे पत्नी सुलोचना भोई आणि 75 वर्षीय आई झरना भोई यांच्यासह येथे राहत होते. 

पैशासाठी अनेकदा आई-वडिलांशी भांडायचा 

प्रभात यांचा मुलगा उदितही त्यांच्यासोबत राहत होता. शिक्षकाचा एक मुलगा रायपूरमध्ये एमबीबीएस करत आहे. प्रभातचा मोठा मुलगा उदित भोई याला ड्रग्जचे व्यसन असल्याचे सांगितले जात आहे. पैशासाठी तो अनेकदा आई-वडिलांशी भांडत असे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 मे रोजी शिक्षक प्रभात भोई आणि त्यांचा मुलगा उदित यांच्यात पैशांवरून वाद झाला होता. त्याच दिवशी उदितने वडिलांच्या हत्येचा कट रचला. घरातील सर्वजण झोपी गेल्यावर उदितने रात्री 2 ते 3 च्या दरम्यान आधी वडिलांच्या डोक्यावर हॉकी स्टिकने हल्ला केला, 

सॅनिटायझर टाकून तिघांचेही मृतदेह 2 दिवस जाळले

आई सुलोचनाची हत्या केली. उदितच्या आजीला जाग आल्याने तिनेही त्याच्या डोक्यात काठीने वार करून त्याचा खून केला. आई-वडील आणि आजीची हत्या केल्यानंतर उदितने मृतदेह घरातील बाथरूममध्ये ठेवला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने घरामागे लाकूड आणि सॅनिटायझर टाकून तिघांचेही मृतदेह दोन दिवस जाळले. खुनाचा आरोपी उदित भोई याने अत्यंत धूर्तपणे 12 मे रोजी सिंगोडा पोलीस ठाण्यात वडील, आई आणि आजी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: to get government job compassionate appointment son killed teacher father mother grandmother