पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून पतीने घेतला गळफास ; हिंजवडी येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 01:33 PM2020-06-15T13:33:59+5:302020-06-15T13:36:08+5:30

पोलिसांकडे खोट्या तक्रारी करून फिर्यादी यांच्या वडिलांशी वाद घालून त्यांचे मानसिक खच्चीकरण केले...

Tired of his wife's immoral relationship, the husband was committed suicidé ; Incident at Hinjewadi | पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून पतीने घेतला गळफास ; हिंजवडी येथील घटना 

पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून पतीने घेतला गळफास ; हिंजवडी येथील घटना 

googlenewsNext
ठळक मुद्देआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पिंपरी : पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून पतीने गळफास घेऊन जीवन यात्रा संपविली. वडजाईनगर, माण रोड, हिंजवडी येथे शनिवारी (दि. १३) दुपारी अडीचच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तरुणाने तक्रार केली. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, तरुणाची सावत्र आई तसेच सावत्र काकाला पोलिसांनी अटक केली. 
याप्रकरणी हिंजवडी येथील २६ वर्षीय तरुणाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी फियार्दी यांची सावत्र आई, सावत्र काका व ड्रायव्हर या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सावत्र आई हिने सावत्र काका व ड्रायव्हर यांच्याशी अनैतिक संबंध ठेवले म्हणून फिर्यादी यांचे वडिलांनी त्याबाबत विचारणा केली. त्यावरून आरोपी सावत्र आई हिने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच पोलिसांकडे खोट्या तक्रारी करून फिर्यादी यांच्या वडिलांशी वाद घालून त्यांचे मानसिक खच्चीकरण केले. तसेच फिर्यादी यांचे सावत्र काका व ड्रायव्हर यांनी फिर्यादी यांच्या वडिलांना न जुमानता  फिर्यादी यांच्या सावत्र आईसोबत अनैतिक संबंध सुरूच ठेवले. या तिघांच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या वडिलांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी (दि. १३) दुपारी अडीचच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. 
दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त केले, अशी तक्रार फिर्यादी यांनी केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Tired of his wife's immoral relationship, the husband was committed suicidé ; Incident at Hinjewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.