टिळक नगर रेल्वे पोलिसांना सापडलाय चिमुकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 18:49 IST2019-01-24T18:44:22+5:302019-01-24T18:49:05+5:30
पोलिसांना सोशल साईटवर सापडलेल्या चिमुकल्याचा फोटो वायरल केला आहे.

टिळक नगर रेल्वे पोलिसांना सापडलाय चिमुकला
ठळक मुद्देमनोरुग्ण असल्याने त्याचे नाव व उत्तर माहिती पोलिसांना मिळविण्यास अडचण येत आहे. टिळक नगर पोलीस ठाण्यास संपर्क साधून ओळख पटवून मुलाला ताब्यात देण्यात येईल.
मुंबई - टिळक नगर पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाबाहेर एक चिमुकला पोलिसांना सापडला आहे. तो मनोरुग्ण असल्याने त्याचे नाव व उत्तर माहिती पोलिसांना मिळविण्यास अडचण येत आहे. त्यामुळे पोलिसांना सोशल साईटवर सापडलेल्या चिमुकल्याचा फोटो वायरल केला आहे.
टिळक नगर रेल्वे पोलिसांच्या पथकाने शेजारी असलेल्या परिसरात चौकशी केली असता त्या मुलाचे पालक सापडलेले नाहीत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे या मुलाबाबत काही माहिती असल्यास टिळक नगर पोलीस ठाण्यास संपर्क साधून ओळख पटवून मुलाला ताब्यात देण्यात येईल. मुलाची ओळख पटविण्यासाठी तसेच त्याच्या पालकांना शोधण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.