शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

टिळक नगर आगप्रकरण : विकासकासह दोघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 21:29 IST

या तिघांविरोधात भा. दं. वि. कलम ३०४ (२), ३३६, ४२७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक काळे याप्रकरणी तपास करत आहेत. 

ठळक मुद्दे मेसर्स रिलायन्स रिअल्टर्सचे पार्टनर  हेमेंद्र मापारा, सुभक मापारा आणि कोठारी यांच्याविरुद्ध गुन्हा टिळक नगर पोलीस ठाण्यात दाखल या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस निरीक्षक काळे याप्रकरणी तपास करत आहेत.

मुंबई - टिळक नगर आगप्रकरणी मेसर्स रिलायन्स रिअल्टर्सचे पार्टनर  हेमेंद्र मापारा, सुभक मापारा आणि कोठारी यांच्याविरुद्ध गुन्हा टिळक नगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. या तिघांविरोधात भा. दं. वि. कलम ३०४ (२), ३३६, ४२७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक काळे याप्रकरणी तपास करत आहेत. 

टिळक नगर येथील सरगम इमारतीच्या ११ व्या मजल्यावर आग लागल्याने पाच जणांना नाहक जीव गमवावा लागला. ही इमारत मेसर्स रिलायन्स रिअल्टर्सचे पार्टनर हेमेंद्र मापारा, सुभक मापारा आणि कोठारी यांना तेथील रहिवाश्यांनी मे २००६ साली पुनर्विकासासाठी दिली होती. या इमारतीचे बांधकाम पूर्ण करून विकासकाने २०१४ साली त्याचा ताबा रहिवाश्यांना दिला. मात्र, या इमारतीची अग्निशमन यंत्रणा विकासकाने योग्यरीत्या कार्यान्वित केली नव्हती आणि  नियमानुसार १५ व्या म्हणजे शेवटच्या मजल्यावर ठेवण्यात येणाऱ्या रिफ्युजी एरियामध्ये (मोकळी जागा) भिंत घालून इमारतीतील बी विंग आणि सी विंग यांना जोडणारा आपत्कालीन मार्ग बंद केला होता. या इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र व अग्निशमन विभागाचे प्रमाणपत्र नसतानाही फ्लॅटधारकांना या इमारतीत राहण्यास भाग पाडून आगीसारख्या आपत्कालीन दुर्घटनेत आपत्कालीन मार्ग जाणीवपूर्वक बंद करून रहिवाश्यांच्या मृत्यूस विकासकास पोलिसांनी जबाबदार धरले आहे. याबाबत सरगम सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सचिव विवेकानंद चिलया वायंगणकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सुनिता जोशी (72), भालचंद्र जोशी (72), सुमन श्रीनिवास जोशी (83), सरला सुरेश गांगर (52) आणि लक्ष्मीबेन प्रेमजी गांगर (83) अशी मृतांची नावे आहेत. तर श्रीनिवास जोशी (86) आणि अग्निशमन दलाचा जवान छगन सिंह (28) हे जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या अग्नितांडवात मृत्यू पावलेल्या सुनिता जोशी या विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर संजय जोशी यांच्या मातोश्री होत्या.  

टिळकनगर स्टेशनजवळील इमारतीला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू

 

टॅग्स :fireआगCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस