Video : थरारक! भरदिवसा केलेला गोळीबार सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 16:55 IST2019-05-18T16:51:10+5:302019-05-18T16:55:31+5:30
फिल्मीस्टाईलने गोळीबार झाल्याने खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे.

Video : थरारक! भरदिवसा केलेला गोळीबार सीसीटीव्हीत कैद
ठळक मुद्देगोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाला असून या तरुणाचं नाव मनिष असं आहे. मनिषला ४ गोळ्या लागल्या आहेत. तरूणावर जवळपास १० ते ११ गुंडांनी पाठलाग त्याचा करून १७ गोळ्या झाडल्या.
नवी दिल्ली - रोहिणी सेक्टर ११ परिसरात एका तरूणावर भरदिवसा फिल्मीस्टाईलने गोळीबार झाल्याने खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे. या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाला असून या तरुणाचं नाव मनिष असं आहे.
गोळीबारात गंभीर झालेल्या तरूणावर जवळपास १० ते ११ गुंडांनी पाठलाग त्याचा करून १७ गोळ्या झाडल्या. यापैकी मनिषला ४ गोळ्या लागल्या आहेत. गुंडांनी केलेल्या गोळीबाराचे थरारक दृश्य घटनास्थळावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.