वाघुड गावात तलवारीने वार, तीन गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 23:33 IST2022-04-17T23:33:18+5:302022-04-17T23:33:30+5:30
मलकापूर (बुलडाणा) : मलकापूर तालुक्यातील वाघुड गावात हनुमान जयंती कार्यक्रमात लहान मुलांच्या भांडणामुळे मोठ्यांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यवसान धारदार ...

वाघुड गावात तलवारीने वार, तीन गंभीर जखमी
मलकापूर (बुलडाणा) : मलकापूर तालुक्यातील वाघुड गावात हनुमान जयंती कार्यक्रमात लहान मुलांच्या भांडणामुळे मोठ्यांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यवसान धारदार शस्त्राने तिघाजणांवर प्राणघातक हल्ल्यात झाले.
ही घटना रविवारी रात्री ८ ते ९ वाजता दरम्यान घडली. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तिघांना प्रथम मलकापूर उपजिल्हा रुग्णालय, त्यानंतर बुलडाणा येथे पाठवण्यात आले. घटनेत जखमी झालेल्यांमध्ये गौरव मुरलीधर राऊत (२४), मुरलीधर दत्तात्रय राऊत, गंगाबाई मुरलीधर राऊत यांचा समावेश आहे; तर हल्ला होण्याच्या भीतीने करण मुरलीधर राऊत (१६) हा गावातच कुठेतरी लपून बसल्याची माहिती आहे.
त्याचा पोलिसांनी रात्रीच शोध सुरू केला आहे. मलकापूर शहर पोलीस घटनास्थळी चौकशी करीत आहेत. गावातील महेश सोपान वानेरे, विजय ज्ञानू वानेरे, गणेश रमेश दांडगे यांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.