शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अपघातात तिघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 20:17 IST

नालासोपारा - वसई तालुक्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील रस्ते अपघातात 3 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जण गंभीर ...

ठळक मुद्देरविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मोहम्मद राशीद याची भरधाव वेगातील मोटारसायकल श्रीराम नगर नाक्यावरील सागर इंटरप्रायाजेस मारबल या दुकानासमोरील दुभाजकावर धडकली. पोलिसांनी अपघाताप्रकरणी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे. 

नालासोपारा - वसई तालुक्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील रस्ते अपघातात 3 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहे. पोलिसांनीअपघाताप्रकरणी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा पूर्वेकडील पांचाळ नगर परिसरातील न्यू एकता सोसायटीच्या सदनिका नंबर 3 मध्ये राहणारा सुहास गुरुरीज राव (23) हा तरुण रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आपली गाडी (क्रमांक एम एच 48 ए एस 7996) नवापूर येथून अथलिक रिसॉर्टच्या बाजूने राजोडी येथील बिमलेवाडी येथे पोहचताच सुहास याचे गाडीवरील नियंत्रण बिघडले आणि एका झाडावर गाडी आदळली. घटनास्थळीच सुहासचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पाठीमागे बसलेला मित्र शुभम अहिरे हा गंभीर जखमी झाला आहे. अर्नाळा सागरी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून तपास करत आहे. तर दुसऱ्या घटनेत नालासोपारा पूर्वेकडील वाकणपाडा येथील गरीब नवाज परिसरातील फुरकान चाळीत राहणारा अल्पवयीन 15 वर्षीय मोहम्मद राशिद फतेमोहम्मद खान हा मोटार सायकल (क्रमांक एम एच 48 डी डी 7654) घेऊन आणि पाठीमागे इरफान खान या मित्राला बसवून भरधाव वेगाने जात होता. रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मोहम्मद राशीद याची भरधाव वेगातील मोटारसायकल श्रीराम नगर नाक्यावरील सागर इंटरप्रायाजेस मारबल या दुकानासमोरील दुभाजकावर धडकली. यात मोहम्मद राशीद याचा जागेवर मृत्यू झाला असून इरफान गंभीर जखमी झाला आहे. तुळींज पोलिसांनी अपघातात मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मनवेल पाडा परिसरात राहणारे संतोष रामनाथ जयस्वाल (52) यांचा चंदनसार रोडवरील तांदूळ बाजार परिसरात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला आहे.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यूVasai Virarवसई विरार