खारमध्ये ६१ लाखांच्या एमडी ड्रगसह तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 13:33 IST2019-04-18T13:30:21+5:302019-04-18T13:33:35+5:30
दया नायक यांच्या पथकाची कारवाई

खारमध्ये ६१ लाखांच्या एमडी ड्रगसह तिघांना अटक
ठळक मुद्देसंजय पांडे (४८), सचिन मुदलियार (४२) आणि रोशनकुमार पांडे (३२) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. एकावर दिल्लीमध्ये २०११ मध्ये एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
मुंबई - एमडीची तस्करी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या गुरुवारी खार पोलिसांनी आवळल्या. आरोपींकडून जवळपास ६१ लाखांचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात पोलीस निरीक्षक दया नायक आणि त्यांच्या पथकाला यश मिळाले आहे. संजय पांडे (४८), सचिन मुदलियार (४२) आणि रोशनकुमार पांडे (३२) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. यातील एकावर दिल्लीमध्ये २०११ मध्ये एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल असून तो जामीनावर बाहेर होता. त्यानुसार पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.