तीन महिन्याच्या बालिकेचा रुमालाने गळा दाबून खून; आरोपीस अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2022 21:48 IST2022-10-12T21:16:49+5:302022-10-12T21:48:12+5:30

पिंप्री प्र.दे. येथील शोभना सोनू ठाकरे (२७) ही पती, मुलांसह वास्तव्यास आहे.

Three-month-old girl strangled with a handkerchief; Accused arrested in jalgaon | तीन महिन्याच्या बालिकेचा रुमालाने गळा दाबून खून; आरोपीस अटक 

तीन महिन्याच्या बालिकेचा रुमालाने गळा दाबून खून; आरोपीस अटक 

- संजय सोनार

चाळीसगाव (जि.जळगाव)  :  अवघ्या तीन महिन्यांच्या गुंजन या चिमुकलीचा रुमालाने गळा दाबून खून करण्यात आला.  अंगावर शहारे आणणारी ही घटना पिंप्री प्र.दे. ता. चाळीसगाव येथील इंदिरानगर भागात मंगळवारी रात्री घडली. आरोपीस अटक करण्यात आली आहे. 
अरविंद कैलास पाटील (४०)  असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

पिंप्री प्र.दे. येथील शोभना सोनू ठाकरे (२७) ही पती, मुलांसह वास्तव्यास आहे. पती सोनू ठाकरे हा मोजमजुरी करतो. मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास  घर खर्चाला पैसे देत नाही,  या कारणावरून पती- पत्नीचे भांडण झाले.  त्यानंतर रात्रीच्या सुमारास संशयित अरविंद पाटील  हा कोयता घेवून घरात शिरला.

महिलेस त्याने कोयत्याचा धाक दाखवत गप्प बसण्यास सांगितले. नंतर घरातील बिर्याणी खाल्ली व नंतर विवाहितेवर कोयता उगारून खिशातील रूमालाने तीन महिन्याची बालिका गुंजन सोनू ठाकरे हिचे नाक व तोंड दाबले. त्यातच या बालिकेचा मृत्यू झाला. याबाबत विवाहितेने पतीला या घटनेची माहिती दिल्यानंतर संशयिताचा पाठलाग करण्यात आला.  मात्र तो तत्पूर्वीच पसार झाला. मेहुणबारे पोलिसांना माहिती कळवल्यानंतर पोलीस अधिकारी कृषीकेश रावले यांच्यासह सहकार्‍यांनी धाव घेत पंचनामा केला.

Web Title: Three-month-old girl strangled with a handkerchief; Accused arrested in jalgaon