अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 21:06 IST2021-02-25T21:05:23+5:302021-02-25T21:06:02+5:30
Gangrape : सामूहिक बलात्कार केला. कुठे वाच्यता केल्यास मारण्याची धमकी दिली .

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना अटक
मीरारोड - भाईंदर पश्चिम भागात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका सदनिकेवर बोलावून तिच्यावर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी भाईंदर पोलिसांनी गुरुवार २५ फेब्रुवारी रोजी तीन आरोपींना अटक केली आहे . ठाणे न्यायालयाने त्यांना ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, चार दिवसांपूर्वी सदर पीडितेस तिच्या परिचयातील एकाने त्याच भागातील एका सदनिकेत रात्री १० च्या सुमारास बोलावले होते . मुलगी तेथे गेली असता त्याच्या सह अन्य दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. कुठे वाच्यता केल्यास मारण्याची धमकी दिली .
सदर प्रकाराबाबत मुलीच्या निकटवर्तीयांना समजल्यावर त्यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात धाव घेत घडला प्रकार सांगितला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तिघाही आरोपीना बेड्या ठोकल्या. यातील एक आरोपी ५० वर्षीय तर दोघे २० ते २२ वयोगटातील आहेत. आरोपी व पीडिता हे एकाच परिसरात राहणारे व एकमेकांना ओळखत असल्याचे सांगण्यात आले. आरोपींबद्दल परिसरात संताप व्यक्त होत आहे. सहाय्यक आयुक्त शांतीलाल जाधव व भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शना खाली आरोपींना राहत्या घरातून अटक केल्यावर ठाणे न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. भाईंदर पोलीस पुढील तपास करत आहेत.