गोठ्यातून तीन शेळ्या चोरीला, अज्ञाताविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

By शेखर पानसरे | Updated: July 8, 2023 18:27 IST2023-07-08T18:26:45+5:302023-07-08T18:27:00+5:30

फिर्यादी २३ वर्षीय महिलेच्या घराशेजारी गोठा आहे. येथे शेळ्या बांधलेल्या होत्या.

Three goats were stolen from the cowshed, a case was registered with the police against the unknown | गोठ्यातून तीन शेळ्या चोरीला, अज्ञाताविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

गोठ्यातून तीन शेळ्या चोरीला, अज्ञाताविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

शेखर पानसरे

संगमनेर : संगमनेर शहरातील जमजम कॉलनी येथील गोठ्यातून  तीन शेळ्या चोरट्याने चोरून नेल्या. यासंदर्भात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत जमजम कॉलनी येथील रहिवासी २३ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला.     

फिर्यादी २३ वर्षीय महिलेच्या घराशेजारी गोठा आहे. येथे शेळ्या बांधलेल्या होत्या. ७ जुलै रात्री नऊ ते ८ जुलै सकाळी सात या वेळेत अज्ञात चोरट्याने गोठ्यातून तीन शेळ्या चोरल्या. सकाळी सात वाजेच्या सुमारास शेळ्या चोरीला गेल्याचे समजले. त्यानंतर महिलेने संगमनेर शहर पोलिस ठाण्यात येऊन घडला प्रकार पोलिसांना सांगितला, पोलिस उपनिरीक्षक शिवाजीराव फटांगरे यांनी गुन्हा नोंदवून घेतला. या घटनेत सात हजार रुपयांच्या शेळ्या चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक टोपे अधिक तपास करीत आहेत. यापूर्वी देखील संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात बोकड आणि शेळी चोरीच्या घटना घडल्या होत्या.

Web Title: Three goats were stolen from the cowshed, a case was registered with the police against the unknown