डॉक्टर दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून लुटणारे तिघेजण जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 19:39 IST2019-06-10T19:38:33+5:302019-06-10T19:39:47+5:30
ग्ण असल्याची बतावणी करून उपचार करण्यासाठी डॉक्टरला झोपेतून उठवून तीन भामट्यांनी चाकूच्या धाकावर डॉक्टर दाम्पत्याला लुटल्याची घटना 2 जून रोजी घडली होती.

डॉक्टर दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून लुटणारे तिघेजण जेरबंद
यवतमाळ - रुग्ण असल्याची बतावणी करून उपचार करण्यासाठी डॉक्टरला झोपेतून उठवून तीन भामट्यांनी चाकूच्या धाकावर डॉक्टर दाम्पत्याला लुटल्याची घटना 2 जून रोजी महागाव तालुक्यातील मोरथ येथे घडली होती. त्या घटनेतील तीन आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहे. 12 जून पर्यंत आरोपींना पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
मोरथ येथील डॉक्टर मदन चक्करवार यांच्या घरी रुग्ण म्हणून आलेल्या तिघा जणांनी डॉक्टरच्या गळ्यावर सुरा लावून त्यांच्याकडील रोख रक्कम आणि त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मणी, मंगळसूत्र चाकूच्या धाकावर लुटून नेले होते. या जबरी चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हा शाखेचे फौजदार निलेश शेळके यांनी पुसद येथून संशयित तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
अविनाश अशोक नेमाडे (वय 27) रा. मोरथ, संजय उत्तम लोखंडे (वय 41) अनिल लहानु दोडके (वर्य 22) दोघेही रा. पुसद यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीला महागाव न्यायालयामध्ये हजर केले असता 12 जून पर्यंत त्यांना पोलिस कस्टडी देण्यात आली आहे.
ठाणेदार दामोदर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील पंडागळे तपास करत आहेत. अटकेतील आरोपी कडून बरेच गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.