आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या तिघांना अटक; दादर पोलिसांनी केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 17:16 IST2019-04-13T17:15:40+5:302019-04-13T17:16:55+5:30
कोलकत्ता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल या सामन्यावर सट्टा लावत होते.

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या तिघांना अटक; दादर पोलिसांनी केली कारवाई
मुंबई - आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा दादर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या सट्टेबाजांकडून 20 मोबाइल फोन, 25 सिमकार्ड, 1 टीव्ही संच आणि एक लॅपटॉप पोलिसांनी जप्त केला आहे. या सर्वांची किंमत एक लाख रुपये आहे. हे सट्टेबाज काल झालेल्या कोलकत्ता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल या सामन्यावर सट्टा लावत होते.
दादरच्या एका उच्चभ्रू वस्तीत आरोपी संजय लपासिया हा राहतो. याच्याच घरी हे सट्टेबाज आयपीएलवर पैसे लावत होते. संजयसोबत रमेश गंगणे आणि उत्तम जैन हे देखील होते. याबाबतची माहिती दादर पोलिसांना मिळाल्यीनंतर पोलिसांनी लपासियाच्या घरावर कारवाई केली. पोलिसांनी या तिघांना रंगेहाथ अटक केली असून न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई - आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या तिघांना अटकhttps://t.co/fUWIufFuiq
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) April 13, 2019