शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मीरारोडमधून २ किलो चरससह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2020 6:33 PM

Drug Cases : त्यांचा एक साथीदार पळून गेला असून जप्त चरसची किंमत ८ लाख रुपये इतकी आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी लागलीच नदीम अब्दुल रहीम चौगुले (२७), दाऊद मकबूल अन्सारी (२५), अर्षद सलाऊद्दीन खान (२६) ह्या तिघांना अटक करून चरसच्या साठ्या सह मीरारोड पोलिसांच्या स्वाधीन केले.

मीरारोड - मीरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवार उद्यान परिसरात तिघा जणांना दोन किलो चरस सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांचा एक साथीदार पळून गेला असून जप्त चरसची किंमत ८ लाख रुपये इतकी आहे.सोमवारी रात्री १० च्या सुमारास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे पथक मीरारोडच्या शिवार उद्यान परिसरात गस्त घालत असताना त्यांना काही तरुणांचा संशय आला. पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्या हातातील पिशवीमध्ये चरस हा अमली पदार्थ आढळून आला.

धक्कादायक! देशी दारूच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला

पोलिसांनी लागलीच नदीम अब्दुल रहीम चौगुले (२७), दाऊद मकबूल अन्सारी (२५), अर्षद सलाऊद्दीन खान (२६) ह्या तिघांना अटक करून चरसच्या साठ्या सह मीरारोड पोलिसांच्या स्वाधीन केले. ह्या दरम्यान यांचा एक साथीदार रहेमान हा मात्र पळून गेला. आरोपींकडून २ किलो २० ग्रॅम चरस जप्त केले असून त्याची बाजारात किंमत ८ लाख ८ हजार रुपये इतकी असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मीरारोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास मीरारोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम हे करत आहेत. सदर चरस आरोपींनी कुठून आणले होते व त्याची कोणाला विक्री करणार होते हे तपास नंतर उघड होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थArrestअटकPoliceपोलिसmira roadमीरा रोड