शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

खुनाच्या गुन्ह्यातील दोन अल्पवयीन आरोपीसह तिघे जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 5:35 PM

गस्त पथकातील कर्मचारी तेथे थांबले असताना तीन आरोपी तेथे संशयीतरीत्या थांबलेले दिसून आले...

ठळक मुद्देदेहूरोड : गुन्हे शाखा युनिट पाचची कारवाई

पिंपरी : देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या तीन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने मंगळवारी (दि. १७) ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत गांधी गुस्सर (वय २४, रा. देहुरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच दोन अल्पवयीन आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे.  गुन्हे शाखा युनिट पाचच्या कर्मचाऱ्यांकडून मंगळवारी (दि. १७) देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालण्यात येत होती. देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील तीन आरोपी देहूरोड येथील पारशी चाळ येथे येणार आहेत, अशी माहिती गस्त पथकातील पोलीस कर्मचारी फारुक मुल्ला व मयूर वाडकर यांना मिळाली. त्यानुसार, गस्त पथकातील कर्मचारी तेथे थांबले असताना तीन आरोपी तेथे संशयीतरीत्या थांबलेले दिसून आले. त्यांना पोलिसांचा सुगावा लागताच ते पळ काढू लागले असता त्यांना शिताफिने ताब्यात घेण्यात आले.  पोलिसांना पाहताच पळून जाण्याचे कारण विचारले असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यातील दोन अल्पवयीन आरोपी व प्रशांत गांधी देहुरोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. तिघांनाही देहुरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त, गुन्हे सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे - २ श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस कर्मचारी फारुक मुल्ला, मयुर वाडकर, धनराज किरनाळे, संदीप ठाकरे, स्वामीनाथ जाधव, धनंजय भोसले, राजकुमार इघारे, दत्तात्रय बनसुडे, भरत माने, ज्ञानेश्वर गाडेकर, श्यामसुंदर गुट्टे व दयानंद खेडकर यांनी कारवाई केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडArrestअटकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस