खुनाच्या गुन्ह्यातील दोन अल्पवयीन आरोपीसह तिघे जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 05:35 PM2019-09-20T17:35:13+5:302019-09-20T17:38:05+5:30

गस्त पथकातील कर्मचारी तेथे थांबले असताना तीन आरोपी तेथे संशयीतरीत्या थांबलेले दिसून आले...

three accused with minor arrested in the case of murder | खुनाच्या गुन्ह्यातील दोन अल्पवयीन आरोपीसह तिघे जेरबंद

खुनाच्या गुन्ह्यातील दोन अल्पवयीन आरोपीसह तिघे जेरबंद

Next
ठळक मुद्देदेहूरोड : गुन्हे शाखा युनिट पाचची कारवाई

पिंपरी : देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या तीन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने मंगळवारी (दि. १७) ही कारवाई केली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत गांधी गुस्सर (वय २४, रा. देहुरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच दोन अल्पवयीन आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे.  
गुन्हे शाखा युनिट पाचच्या कर्मचाऱ्यांकडून मंगळवारी (दि. १७) देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालण्यात येत होती. देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील तीन आरोपी देहूरोड येथील पारशी चाळ येथे येणार आहेत, अशी माहिती गस्त पथकातील पोलीस कर्मचारी फारुक मुल्ला व मयूर वाडकर यांना मिळाली. त्यानुसार, गस्त पथकातील कर्मचारी तेथे थांबले असताना तीन आरोपी तेथे संशयीतरीत्या थांबलेले दिसून आले. त्यांना पोलिसांचा सुगावा लागताच ते पळ काढू लागले असता त्यांना शिताफिने ताब्यात घेण्यात आले.  पोलिसांना पाहताच पळून जाण्याचे कारण विचारले असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यातील दोन अल्पवयीन आरोपी व प्रशांत गांधी देहुरोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. तिघांनाही देहुरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. 
अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त, गुन्हे सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे - २ श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस कर्मचारी फारुक मुल्ला, मयुर वाडकर, धनराज किरनाळे, संदीप ठाकरे, स्वामीनाथ जाधव, धनंजय भोसले, राजकुमार इघारे, दत्तात्रय बनसुडे, भरत माने, ज्ञानेश्वर गाडेकर, श्यामसुंदर गुट्टे व दयानंद खेडकर यांनी कारवाई केली.

Web Title: three accused with minor arrested in the case of murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.