शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मौजमजेसाठी वाहनचोरी करणारे तिघे जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 19:54 IST

दोन रिक्षा, चार दुचाकी अशी ५ लाख २५ हजार रुपये किमतीची सहा वाहने चोरले.

पिंपरी : मौजमजेसाठी वाहनचोरी करणाऱ्या तीन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. पिंपरी - चिंचवड पोलिसांच्या खंडणी, दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली. आरोपींकडून दोन रिक्षा व  १० दुचाकी अशी ७ लाख ८५ हजारांची १२ वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी, दरोडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे व अनिकेत हिवरकर पथकासह निगडीत गस्त घालत होते. त्या वेळी पोलीस नाईक निशांत काळे यांना माहिती मिळाली की, वाहन चोरी करणारा आरोपी प्रवीण चंद्रकांत भंडारी (वय २०, रा. निगडी) हा निगडी आॅटोस्कीम येथे थांबला आहे. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. तो आणि त्याचा मित्र अमोल उर्फ बाळा अनंत जाधव (वय १९, रा. साने कॉलनी, चिखली) असे दोघे मिळून वाहन चोरी करत असल्याचे त्याने चौकशी दरम्यान सांगितले. त्यानुसार पोलिसांनी अमोल जाधव यालाही ताब्यात घेतले. दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी दोन रिक्षा, चार दुचाकी अशी ५ लाख २५ हजार रुपये किमतीची सहा वाहने चोरल्याचे सांगितले. त्यांच्याकडून ही वाहने जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या वाहनांपैकी चार वाहनांच्या चोरीबाबत चिखली, निगडी, सांगवी या पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल आहे. उर्वरित दोन वाहनांबाबत पोलिस तपास करत आहेत. आरोपी प्रवीण भंडारे याच्यावर उस्मानाबाद येथील तुळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे पथकासह पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा तपास करत होते. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की, आरोपी सागर उर्फ लाला गगलानी (वय २९, रा. साईचौक, पिंपरी) याच्याकडे चोरीची दुचाकी असून तो डेअरी फार्मकडील रस्त्याने कालभैरवनाथ मंदिराकडे जात आहे. त्यानुसार सापळा रचून आरोपीला दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता मौजमजेसाठी पिंपरी परिसरातून त्याने २ लाख ६० हजार रुपये किमतीच्या सहा मोपेड दुचाकी चोरल्याचे कबूल केले. आरोपी सागर गगलानी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात २०१२ मध्ये गुन्हा दाखल आहे. काही कामधंदा नसल्याने वाहने चोरून त्यांच्या नंबरप्लेट बदलून त्यांची विक्री करायची किंवा कोणाकडे तरी गहाण ठेवून पैसे मिळवायचे. त्यातून मिळालेल्या पैशाने आरोपी गगलानी मौजमजा करायचा.

वाहन चोरी रोखण्यासाठीची उपाययोजना * वाहन सुरक्षित ठिकाणी व प्रकाशात पार्किंग करावे* वाहनाला सहज दिसणार नाही अशा ठिकाणी जीपीएस यंत्रणा बसवावी * वाहनाचे लॉक चांगल्या दजार्चे असावे* वाहनात आवश्यक तेवढेच इंधन ठेवावे* दुचाकी वाहनांना साखळी लॉक बसवावे* वाहनाच्या काचेवर नंबर इचिंग (कोरून) घ्यावेत* पार्किंगमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीThiefचोरPoliceपोलिसArrestअटक