क्रिकेट प्रशिक्षणातून वगळण्याची धमकी देत, मुलीशी अश्लील चाळे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 08:06 IST2023-09-02T08:06:14+5:302023-09-02T08:06:24+5:30
मूळचा औरंगाबादचा असलेल्या ३३ वर्षीय क्रिकेट प्रशिक्षकाला देवनार पोलिसांनी अटक केली.

क्रिकेट प्रशिक्षणातून वगळण्याची धमकी देत, मुलीशी अश्लील चाळे!
मुंबई : पूर्व उपनगरातील एका इंटरनॅशनल शाळेतील क्रिकेट प्रशिक्षकाने विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. क्रिकेट प्रशिक्षणातून काढून टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करत होता.
मूळचा औरंगाबादचा असलेल्या ३३ वर्षीय क्रिकेट प्रशिक्षकाला देवनार पोलिसांनी अटक केली. आरोपीने २६ ऑगस्टला शाळेच्या मैदानाशेजारील खोलीत पीडित मुलीसोबत अश्लील चाळे केले. मुलीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितल्यानंतर, पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार, देवनार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.