महिलेला धमकावून बलात्कार; सोशल मीडियावर फोटो केले व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 15:25 IST2020-11-03T15:24:53+5:302020-11-03T15:25:50+5:30
फिर्यादी महिला व या तरुणाची व्हॉटसअॅपवरुन ओळख झाली होती.

महिलेला धमकावून बलात्कार; सोशल मीडियावर फोटो केले व्हायरल
पुणे : व्हॉटसअॅपवरुन झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन धमकावून महिलेवर बलात्कार करुन तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.
सुरज चंद्रकांत माने (वय २०, रा. मोहननगर, धनकवडी) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आंबेगाव पठार येथे राहणाऱ्या तरुणीने फिर्याद दिली आहे़
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व या तरुणाची व्हॉटसअॅपवरुन ओळख झाली होती.त्याने या महिलेला २७ सप्टेंबर रोजी भारती हॉस्पिटलजवळ भेटायला बोलावले. तेथे तिच्या गळ्याला चाकू लावून एका लॉजवर जबरदस्तीने नेऊन तिच्यावर बलात्कार केला. फिर्यादीचे फोटो काढून घेऊन ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तिला लग्नाची मागणी घातली. त्याला फिर्यादीने नकार दिल्यावर तिचे फोटो टिकटॉक व फेसबुकवर अपलोड केले. तसेच तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकारामुळे फिर्यादी घाबरुन गावी गेल्या. त्यांनी सांगलीतील आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आटपाडी पोलिसांनी हा गुन्हा भारती विद्यापीठ पोलिसांकडे वर्ग केला आहे.पोलीस निरीक्षक ताम्हाणे अधिक तपास करीत आहेत.