विद्यार्थ्याचा सिगारेट ओढल्याचा व्हिडीओ घरी दाखविण्याची धमकी, ९ लाख ५९ हजाराचे सोने लुबाडले
By सदानंद नाईक | Updated: April 12, 2025 17:58 IST2025-04-12T17:58:41+5:302025-04-12T17:58:49+5:30
चौकडी विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विद्यार्थ्याचा सिगारेट ओढल्याचा व्हिडीओ घरी दाखविण्याची धमकी, ९ लाख ५९ हजाराचे सोने लुबाडले
- सदानंद नाईक
उल्हासनगर : शालेय मुलाला सिगारेट ओढल्याचा व्हिडीओ घरी दाखविण्याचा व पोलिसात तक्रार करतो, असी धमकी देऊन चौकडीने ९ लाख ५९ लाखाचे सोने लुबाडल्याची घटना उघड झाली. याप्रकरणी चौकडी विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-१, दिपक क्लासेस ढोलूराम दरबार येथे १४ वर्षाच्या तनुष वासवानी या शालेय मुलाला सिगारेट ओढल्याचा व्हिडिओ घरी दाखवितो. तसेच याबाबत पोलिसात तक्रार देतो. असी धमकी दक्ष रामाणी, राहुल कांबळे, कृष्णा उर्फ गुडडो व राजन या चौकडीने संगगंमत करून दिली. या धमकीला घाबरून चौघडीने १४ फेब्रुवारी ते १३ मार्च २०२५ दरम्यान ९ लाख ५९ हजार किंमतीचे सोन्याचे दागिने लुबाडले.
दरम्यान हा सर्व प्रकार तनुष याने वडिलांना सांगितल्यावर त्यांना धक्का बसला. त्यांनी याबाबत उल्हासनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. उल्हासनगर पोलिसांनी चौघडीवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.