काँग्रेस सत्तेत आली तर मोदींना जिवे मारण्याची धमकी; कर्नाटकातील व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 11:21 IST2024-03-05T11:20:48+5:302024-03-05T11:21:37+5:30
मोहम्मद रसूल कद्दारे असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर हैदराबादसह विविध ठिकाणी त्याचा शोध घेतला जात आहे.

काँग्रेस सत्तेत आली तर मोदींना जिवे मारण्याची धमकी; कर्नाटकातील व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
देशात काँग्रेस सत्तेत आली तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिवे ठार मारण्य़ाची धमकी देणाऱ्या कर्नाटकच्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हिड़ीओ पोस्ट करून त्याने ही धमकी दिली होती. या व्हिडीओमध्ये हा व्यक्ती हातात तलवार घेऊन ही धमकी देत होता. त्याचा आता शोध घेतला जात आहे.
मोहम्मद रसूल कद्दारे असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर हैदराबादसह विविध ठिकाणी त्याचा शोध घेतला जात आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, मोहम्मद रसूल कद्दारे यांने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यात तो तलवार हातात घेऊन पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी देताना दिसत होता.
आयपीसीच्या कलम ५०५(१)(बी), २५(१)(बी) आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये त्याच्याविरुद्ध यादगिरीच्या सुरपूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींची हत्या आणि अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणार ईमेल केंद्रीय सुरक्षा एजन्सीला आला होता. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या सुटकेच्या मागणीसह ५०० कोटी रुपये मागण्यात आले होते.