Threat to my life from Shiv Sena - Kangana ranaut | शिवसेनेकडून माझ्या जीवाला धोका - कंगना

शिवसेनेकडून माझ्या जीवाला धोका - कंगना


लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : शिवसेनेचा माझ्यावर राग असून, त्यांच्यापासून माझ्या  जीवाला धोका आहे. त्यामुळे माझ्याविरुद्ध मुंबईत सुरू असलेले सर्व खटले सिमला येथील न्यायालयात चालविण्यात यावेत, अशी विनंती अभिनेत्री कंगना रनौतने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. 


कंगनाविरुद्ध मुंबईच्या न्यायालयांत अनेक खटले सुरू आहेत. प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनीही कंगनाविरोधात मानहानीचा दावा केला आहे. त्या प्रकरणात हजर न राहिल्याने न्यायालयाने कंगनाच्या विरुद्ध जामीनपात्र वॉरंट काढले असून, पुढील सुनावणीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. 
मुंबईच्या न्यायालयांमध्ये येण्याचे टाळण्यासाठीच कंगना व तिच्या बहिणीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेच्या चुकांबद्दल  व शिवसनेने हिंदी चित्रपटसृष्टीतील काही मंडळींच्या मदतीने चालविलेल्या अयोग्य गोष्टींबद्दल बोलल्यामुळेच ते आपणास संपविण्यासाठी कोणत्याही थराला जातील. महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार असून, ते आपला छळ करीत आहे, असा आरोपही तिने केला आहे. 


न्याययंत्रणेवर विश्वास
न्याययंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. संबंधित सर्व प्रकरणांमध्ये देशातील कोणत्याही न्यायालयात उपस्थित राहण्यास तयारी आहे. मात्र मुंबईत जाण्यास आपणास भीती वाटते, असे कंगनाचे म्हणणे आहे.

Web Title: Threat to my life from Shiv Sena - Kangana ranaut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.