शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर येथे अल्पवयीन मुलीला बलात्कार करण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 18:05 IST

अल्पवयीन मुलीला अडवत तिच्याशी अश्लील संभाषण करत बलात्कार करण्याची धमकी देण्यात आल्याची घटना इंदापूरमध्ये घडली आहे.

ठळक मुद्देशाळेचा ड्रेस ओढून केली जबरदस्तीविनयभंगासह दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल

इंदापूर : अल्पवयीन मुलीला अडवत तिच्याशी अश्लील संभाषण करत बलात्कार करण्याची धमकी देण्यात आल्याची घटना इंदापूरमध्ये घडली आहे. पीडित मुलीच्या अंगावरील शाळेचा गणवेश ओढून जबरदस्ती करण्याचाही प्रयत्न झाला असून या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी विनयभंगासह दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे. आकाश चंद्रकांत भोई (रा. शहा, ता. इंदापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. इंदापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी नववीमध्ये शिकत आहे. सोमवारी कांदलगाव येथे शाळेमध्ये चालली होती. चालत जात असताना डाळिंबाच्या शेताजवळ आरोपी भोई हा मोटार सायकलवरून पाठीमागे आला. मुलीसमोर थांबून तिच्याशी अश्लील संभाषण करून गैरवर्तन करू लागला. त्याने तिला ‘तुझे वडील कुठे आहेत? अशी विचारणा केली. त्यावर मुलीने ते रात्री बाहेर गेले होते, अद्याप घरी आलेले नसल्याचे सांगितले. आरोपीने तिला, ‘मी तुझ्यावर आता बलात्कार करतो. तुझ्या घरी कोण कोण आहे?’ अशी धमकी दिली. आरोपीने यावेळी तिच्या अंगावरील गणवेश पाठीमागून ओढला. घाबरलेली मुलगी त्याला धक्का देऊन तेथून पळाली. शाळेत न जाता घरी जाऊन आईस सर्व प्रकार सांगितला. आई व आत्या यांच्यासह पोलीस ठाण्यात जाऊन भोईविरुद्ध फिर्याद दिली. या घटनेमुळे इंदापूरमध्ये खळबळ उडाली असून मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर करीत आहेत.

टॅग्स :IndapurइंदापूरPoliceपोलिसRapeबलात्कारStudentविद्यार्थी