छताचा पत्रा फोडून चोरी करणारे अटकेत
By धीरज परब | Updated: December 24, 2022 19:13 IST2022-12-24T19:11:56+5:302022-12-24T19:13:16+5:30
मध्यरात्रीच्या वेळी अज्ञात इसमांनी कारखान्याच्या छताचे पत्रे फोडून आत प्रवेश करत २८५ किलो बजानाच्या स्टीलच्या वस्तू चोरी केल्या होत्या.

छताचा पत्रा फोडून चोरी करणारे अटकेत
मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या औद्योगिक वसाहतीतील एका गाळ्याच्या छताचे पत्रे फोडून आतील स्टील वस्तू चोरणाऱ्या दोघाजणांना पोलिसांनी अटक केली आहे. पूर्वेच्या फाटक मार्गावर विकास इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये नरेश दुबे यांचा गाळा आहे. लाकडी व लोखंडी फर्निचरसाठी लागणाऱ्या स्टीलच्या वस्तू बनविण्याचे काम केले जाते.
मध्यरात्रीच्या वेळी अज्ञात इसमांनी कारखान्याच्या छताचे पत्रे फोडून आत प्रवेश करत २८५ किलो बजानाच्या स्टीलच्या वस्तू चोरी केल्या होत्या. नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भूषण पाटील, गणेश जावळे, सुरेश चव्हाण, नवनाथ घुगे, जयप्रकाश जाधव, ओंकार यादव, सुरजसिंग घुनावत, विनोद जाधव यांच्या पथकाने तपास सुरु केला. गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषण करुन भाईंदर पश्चिम उड्डाणपूल खालून अग्निशमन केंद्राच्या समोरील पदपथावर राहणारे अजय विजय व्यास (१९) व आशिष लक्ष्मण वाघे (१९) ह्या दोघांना अटक केली. आरोपीं कडून नवघर पोलिसांनी चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.