पैसे पुरवणारा एटीएसच्या रडारवर; वांद्र्यातून तिसरा संशयित दहशतवादी ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 03:12 PM2021-09-30T15:12:19+5:302021-09-30T15:13:55+5:30

ATS Action : झाकीर आणि रिझवान यांना अनुक्रमे 18 आणि 19 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आणि सुरुवातीला त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

A third suspected terrorist from Bandra was arrested by the ATS | पैसे पुरवणारा एटीएसच्या रडारवर; वांद्र्यातून तिसरा संशयित दहशतवादी ताब्यात 

पैसे पुरवणारा एटीएसच्या रडारवर; वांद्र्यातून तिसरा संशयित दहशतवादी ताब्यात 

Next
ठळक मुद्देमोहम्मद इरफान रहमत अली शेख (वय ५०) असं संशयित दहशतवाद्याचा नाव आहे.

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) दहशतवादी कृत्यासंबंधी आणखी एका संशयिताला अटक केली आहे. मोहम्मद इरफान रहमत अली शेख (वय ५०) असं संशयित दहशतवाद्याचा नाव आहे. एटीएसने दोन संशयित दहशतवादी झाकीर हुसेन शेख आणि रिझवान मोमीन यांना ताब्यात घेतल्यानंतर तीन दिवसांनी, एटीएसने गुरुवारी या प्रकरणात पुन्हा तिसरी अटक केली.

 

मोहम्मद इरफान रहमत अली शेख (५०) या संशयिताला त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली. एटीएसने उघड केले की, झाकीर आणि रिझवानच्या चौकशी दरम्यान अली शेखच्या भूमिकेबद्दल सांगितले. त्यानंतर त्याला नागपाडा येथील एटीएसच्या कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले आणि गुरुवारी पहाटे अटक करण्यात आली. एका सुत्राने सांगितले, “सतत चौकशी केल्यानंतर त्याने त्याच्या सहभागाची कबुली दिली.

शेख व्यवसायाने शिंपी

"आम्ही त्याच्या घरातून ४९००० रुपये रोख जप्त केले आहेत, जे दहशतवादी कारवायांसाठी होते," तपासकर्त्याने पुढे म्हटले, "त्याला एका अज्ञात व्यक्तीकडून पैसे मिळाले होते ज्याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहोत."

झाकीर आणि रिझवान यांना अनुक्रमे 18 आणि 19 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आणि सुरुवातीला त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. २० सप्टेंबर रोजी एटीएसच्या रिमांडवर न्यायालयात झालेल्या युक्तिवादानंतर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

 

Web Title: A third suspected terrorist from Bandra was arrested by the ATS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.