पुण्यात तिसरा अपघात; बसने मालवाहू टेम्पोला दिली धडक, १ ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 10:17 AM2021-01-11T10:17:21+5:302021-01-11T10:17:43+5:30

Pune Accident: एकूण नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले असून अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना औंध येथील शासकीय रुग्णालय व देहुरोड एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

Third accident in Pune; Bus hits freight tempo, 1 killed | पुण्यात तिसरा अपघात; बसने मालवाहू टेम्पोला दिली धडक, १ ठार

पुण्यात तिसरा अपघात; बसने मालवाहू टेम्पोला दिली धडक, १ ठार

googlenewsNext

किवळे : मुंबई -बेंगळुरू महामार्गावर लातूरहून मुंबईला जाणाऱ्या प्रवासी खाजगी बसने पुढे जाणाऱ्या मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिल्याने पहाटे चार वाजण्याच्या सुमारास किवळे-रावेत  गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील एकूण ४९ प्रवाशांपैकी एका प्रवाशाचा जागीच  मृत्यू झाला आहे. पुण्यातील हा तिसरा भीषण अपघात आहे. 

एकूण  नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले असून अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना औंध येथील  शासकीय रुग्णालय व  देहुरोड एका खाजगी रुग्णालयात  उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे . अपघातानंतर महामार्ग पोलीस व रावेत पोलीस चौकीचे पोलीस. घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्त वाहन महामार्गावरून बाजुला करण्यात आली आहेत. परिणामी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली नाही.

पहिला अपघात

मुंबई बंगळुरु महामार्गावरील अपघातांची मालिका सुरु असून नर्‍हे येथील सेल्फी पॉईंटजवळ ट्रकने पुढे जाणार्‍या ट्रकला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यु झाला. दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, पहाटेच्या सुमारास मुंबई-बंगळुरू महामार्गावर नर्‍हे येथील सेल्फी पॉइंट जवळ एका  मालवाहतूक करणार्‍या ट्रकला पाठीमागून एका ट्रकने धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दोन्हीही वाहने सातारा कडून मुंबईच्या दिशेने जात होती. 


अपघातामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा दूरपर्यंत लागल्या होत्या. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल काळे, पोलीस कर्मचारी महेंद्र राऊत, राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग कर्मचार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.


१०० मीटर अंतरावर दुसरा अपघात
 दरम्यान या अपघात ठिकाणांपासून १०० मीटर अंतरावर पहाटे साडेचारच्या सुमारास दोन ट्रक एकमेकांना धडकून पलटी झाले आहेत. या अपघातात एक जण जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  नवीन कात्रज बोगदा पार केल्यानंतर पुण्याच्या दिशेने जाताना तीव्र उतार असल्याने सुसाट जाणाऱ्या मालवाहतूक वाहनांना ब्रेक लागणे अशक्य होते. ब्रेक फेल झाल्याने या परिसरात वारंवार अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासन हे उपाययोजना करण्याऐवजी फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

Web Title: Third accident in Pune; Bus hits freight tempo, 1 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.