चोरट्यांनी तरुणावर केला चाकूहल्ला आणि काढला पळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 20:44 IST2018-12-25T20:41:37+5:302018-12-25T20:44:18+5:30

हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबाबत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अज्ञात आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.  

The thieves have set up the girl and made a move | चोरट्यांनी तरुणावर केला चाकूहल्ला आणि काढला पळ

चोरट्यांनी तरुणावर केला चाकूहल्ला आणि काढला पळ

ठळक मुद्देखळबळजनक घटना अंबरनाथ एमआयडीसी परिसरात घडलीविमल स्टील दुकानात काम करणारे रोहितकुमार वर्मा आणि अखिलेश वर्मा हे दोघे रात्रीच्या सुमारास दुकानाच्या बाहेर झोपले या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबरनाथ - तीन चोरट्यांनी तरुणावर चाकूहल्ला केल्याची खळबळजनक घटना अंबरनाथ एमआयडीसी परिसरात घडली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबाबत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अज्ञात आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.  

अंबरनाथ येथील आनंदनगर एमआयडीसी परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. विमल स्टील दुकानात काम करणारे रोहितकुमार वर्मा आणि अखिलेश वर्मा हे दोघे रात्रीच्या सुमारास दुकानाच्या बाहेर झोपले होते. याचवेळी ऍक्टिव्हा गाडीवरून तीन अज्ञात तरुण आले आणि त्यांनी या दोघांना उठवून त्यांच्याकडे मोबाइल, पैसे, पाकिटाची मागणी केली. यावेळी अखिलेश वर्मा याने लुटारूंना मोबाइल आणि पैसे देण्यास नकार दिल्याने या तिघांनी त्याला मारहाण करत चाकूने त्याच्यावर वार केले. मात्र तरीही अखिलेशने प्रतिकार कायम ठेवल्याने लुटारूंनी त्याच्यावर हल्ला केला आणि पळ काढला. यानंतर गंभीर जखमी झालेल्या अखिलेशने इतर कंपन्यांच्या सुरक्षारक्षकांच्या मदतीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याच्यावर सध्या उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी  या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The thieves have set up the girl and made a move

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.