शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

ऐकावं ते नवलंच! चोरांनी बोगदा खोदला अन् रेल्वेचं अख्ख इंजिन चोरुन नेलं; बिहारमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 16:05 IST

Bihar News: मुजफ्फरपूरच्या एका भंगाराच्या गोदामात इंजिनचे पार्ट्स आढळल्यानंतर चोरीचा खुलासा झाला.

मुझफ्फरपूर: तुम्ही चोरीच्या अनेक घटना ऐकल्या असतील. पण, बिहारमध्ये चोरीच्या एका घटनेने सर्वांनाच चकीत केले आहे. चोरट्यांनी रोहतास येथे  500 टन वजनाचा लोखंडी पूल चोरल्यानंतर आता आणखी एक मोठी घटना समोर आली आहे. चोरट्यांनी आता चक्क रेल्वे इंजिन गायब केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुझफ्फरपूरमधील एका भंगाराच्या दुकानातून जप्त केलेली बॅग रेल्वे इंजिनच्या पार्ट्सने भरलेली होती.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, गेल्या आठवड्यात बरौनी (बेगूसराय जिल्हा) येथील गरहारा यार्डमध्ये दुरुस्तीसाठी आलेले ट्रेनचे डिझेल इंजिन एका टोळीने चोरीन नेले. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केल असता, सुरुवातीला तीन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुजफ्फरपूरच्या प्रभात कॉलोनीमधील एका भंगाराच्या गोदामातून इंजिनच्या पार्ट्सनी भरलेले 13 बॅग आढळल्या.

चोरीसाठी बोगदा खंदलाएका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ही चोरी घटवून आणण्यासाठी चोरट्यांनी चक्क एक बोगदा तयार केला. या बोगद्यातून चोर यायचे आणि इंजिनचे पार्ट्स चोरुन न्यायचे. या बोगद्यामुळे पोलिसांना किंवा यार्डमध्ये उपस्थित लोकांना चोरीचा पत्ता लागला नाही. आता याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

पूर्णियामध्येही अशीच चोरीपूर्णिया जिल्ह्याही अशाच प्रकारची चोरी झाली होती. चोरट्यांनी एक विंटेज मीटर गेज स्टीम इंजिन चोरुन विकले. हे इंजिन प्रदर्शनासाठी स्थानिक रेल्वे स्टेशनवर ठेवण्यात आले होते. तपासात समोर आले की, एका रेल्वे इंजिनिअरने समस्तीपूर डिव्हिजनच्या डिव्हिजनल मॅकेनिकल इंजीनिअरच्या बनावट पत्राच्या आधारे इंजिन विकले होते.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वे