शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या घरात शिरले चोर; सोन्याचे दागिने, हातघड्याळे लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 08:37 IST

Robbery Case : प्रशासनात खळबळ

नागपूर : प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या ग्रीलचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि दोन हातघड्याळे असा एकूण पावणेदोन लाखांचा ऐवज चोरून नेला. बुधवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आल्यापासून प्रशासनात एकच खळबळ निर्माण झाली.

रवीनगरातील शासकीय वसाहतीत ए-९-१ क्रमांकाच्या निवासात प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी गरिमा नारायण बागडोदिया (वय ४०) राहतात. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी त्या न्यायालयात कर्तव्यावर गेल्या. इकडे निवासस्थानाच्या मागच्या दाराच्या ग्रीलचे कुलूप तोडून चोरटे आत शिरले आणि त्यांनी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त करून अंगठी तसेच सोन्याचे दागिने आणि दोन हातघड्याळे असा एकूण १ लाख, ७७ हजारांचा ऐवज चोरून नेला. बुधवारी सायंकाळी ४.४५ वाजता दरम्यान फिर्यादी घरी परतल्या तेव्हा ही घटना उघडकीस आली. माहिती कळताच अंबाझरीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चोरट्याचा शोध लावण्यासाठी श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांचे पथकही बोलवून घेतले. श्वानाने मुख्य रस्त्यापर्यंतचा मार्ग दाखवला. दरम्यान, प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी चोरी झाल्याचे कळताच एकच खळबळ निर्माण झाली. पोलीस उपायुक्त विनिता साहू यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी चोरीच्या घटनेची माहिती घेऊन तपासासंदर्भात मार्गदर्शन केले.

चाैकीदार नाही अन् सीसीटीव्हीही नाहीप्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेने बरेच मुद्दे उजेडात आणले आहे. या वसाहतीत अनेक उच्च अधिकारी, न्यायदंडाधिकारी तसेच अन्य महत्त्वाचे व्यक्ती वास्तव्याला आहे. मात्र, इकडे चाैकीदार अथवा सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे या चोरीच्या घटनेच्या निमित्ताने उघड केले आहे.

 

टॅग्स :RobberyचोरीnagpurनागपूरPoliceपोलिसCourtन्यायालय