सोन्याची पोत चोरणाऱ्याला ‘ती’ने पळवून लावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 08:25 IST2022-01-05T08:25:08+5:302022-01-05T08:25:15+5:30

सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास खोंडामळी शिवारातील शेतात हा थरार रंगला.

The thief snatched the gold jwellery of women farmer | सोन्याची पोत चोरणाऱ्याला ‘ती’ने पळवून लावले

सोन्याची पोत चोरणाऱ्याला ‘ती’ने पळवून लावले

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेतात काम करत असताना मागून झडप घालत, डोळे बंद करून सोनपोत चोरणाऱ्या भामट्याला महिलेने मोठ्या धाडसाने धडा पळवून लावल्याची घटना तालुक्यातील खाेंडामळी येथे घडली.

सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास खोंडामळी शिवारातील शेतात हा थरार रंगला. संगीताबाई भिकन पाटील शेतात काम करत असताना अचानक मागून त्यांचे डोळ दाबून गळ्यातील सोनपोत तोडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. संगीताबाईंनी प्रसंगावधान राखवत भामट्याचे हात धरून ठेवले. 

चोरट्याने त्यांच्या गळ्याला हाताचा विळखा देण्याचा प्रयत्न केला. भामट्याचा हा डाव शिताफीने उधळून लावत चोरट्याच्या हाताचा त्यांनी करकचून चावा घेतला. बराचवेळ झटापट सुरू होती.

पाठलाग करून दिले पाेलिसांच्या ताब्यात
nसंगीताबाई यांनी जीवाच्या आकांताने आरोळ्या मारल्यानंतर दीर मदतीला धावून आला. 
nझटापटीत भामट्याने त्यांच्या डोळ्याजवळ चावा घेतल्याने त्या जखमी झाल्या. आसपासच्या शेतात काम करणारे लोक धावून येत असल्याचे पाहून तेथून पळ काढला. 
nनागरिकांनी त्याला पाठलाग करून पकडले. हरेश गोकूळ भिल असे त्याचे नाव असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: The thief snatched the gold jwellery of women farmer