नोकरच निघाले चोर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 06:25 IST2021-04-02T06:25:09+5:302021-04-02T06:25:34+5:30

घरकामासाठी ठेवलेले नोकरच चोर निघाल्याचा प्रकार गावदेवी पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आला आहे. यात, आरोपींनी घरातील ५५ लाखांच्या दागिन्यांवर हात साफ केला होता. गावी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना अटक केली.

The thief left | नोकरच निघाले चोर  

नोकरच निघाले चोर  

मुंबई : घरकामासाठी ठेवलेले नोकरच चोर निघाल्याचा प्रकार गावदेवी पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आला आहे. यात, आरोपींनी घरातील ५५ लाखांच्या दागिन्यांवर हात साफ केला होता. गावी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना अटक केली.
लाल महादेवी मुखिया, अनहुल मुखिया  अशी अटक आरोपींची नावे असून, दोघेही बिहारच्या दरभंगा भागातील रहिवासी आहेत. दक्षिण मुंबईतील कोटेजा कुटुंबीयांनी त्यांना नुकतेच कामावर ठेवले होते. कोटेजा कुटुंबीयात वृद्ध नागरिक असल्यामुळे ते लवकर झोपत होते. सोमवारी कुटुंबीय कामानिमित्त बाहेर जाताच दुकलीने घरातील ५५ लाखांचे दागिने चोरुन पळ काढला. गावदेवी पोलिसांनी तपासाअंती त्यांचे मोबाइल लोकेशन काढले. त्यात ते मुंबई सेंट्रल परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दोघांना अटक केली. 

Web Title: The thief left