शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर साक्ष नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 20:54 IST

कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या चौकशीकरिता स्थापन केलेल्या आयोगासमोर साक्ष देण्यास माओवादी संबंध प्रकरणातील संशयित आरोपी अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी नकार दिला.

ठळक मुद्देसंशयित आरोपी गडलिंग यांचा नकार : खटल्यावर परिणाम होण्याची शक्यता

पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या चौकशीकरिता स्थापन केलेल्या आयोगासमोर साक्ष देण्यास माओवादी संबंध प्रकरणातील संशयित आरोपी अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी नकार दिला. साक्ष नोंदविण्यास त्याचा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यावर परिमाण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साक्ष देणार नसल्याचे अ‍ॅड. गडलिंग यांनी शुक्रवारी आयोगासमोर स्पष्ट केले.अ‍ॅड. गडलिंग व सुधीर ढवळे माओवादी संबंध प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दोघांनी चौकशी आयोगासमोर जुलै २०१८ मध्ये प्रतिज्ञापत्र सादर करत, एल्गार परिषदेतील आम्ही प्रमुख घटक असून काही महत्त्वपूर्ण गोष्टी आयोगासमोर आणू इच्छितो, असे म्हटले होते. त्यानुसार त्यांची ६ सप्टेंबर रोजी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर साक्ष घेण्याचा निर्णय २२ ऑगस्ट रोजी घेतला होता. शुक्रवारी सकाळी अ‍ॅड. गडलिंग यांना आयोगासमोर हजर केले. मात्र त्यांनी साक्ष देण्यास नकार दिला. आयोगाचे प्रमुख कोलकता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती जे. एन. पटेल व सदस्य सुम्मीत मलिक यांच्या समोर चौकशी सुरू आहे. अ‍ॅड. गडलिंग यांनी आयोगास सांगितले की, मला या प्रकरणातील काही बाबी आयोगाच्या समोर आणायच्या होत्या. त्यामुळे माझी साक्ष घ्यावी, अशी मागणी करणारे प्रतिज्ञापत्र केले होते. मात्र साक्ष दिल्यास त्याचा न्यायालयीन खटल्यात सुरू असलेल्या बचावावर परिमाण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी आयोगाची माफी मागतो व आपले प्रतिज्ञापत्र मागे घेतो.ह्ण न्यायालयात बचावाबाबत युक्तिवाद केल्यानंतर त्यांची माहिती आयोगासमोर येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.ढवळे यांनी आज (दि. ७) आयोगासमोर साक्ष होणार आहे. त्याबाबत त्यांना व येरवडा प्रशासनास माहिती दिली आहे, अशी माहिती आयोगाचे कामकाज पाहणारे वकील आशिष सातपुते यांनी दिली. आयोगाने कारागृहात येऊन तात्पुरत्या कोर्टरुमध्ये दोघांची साक्ष नोंदविण्याचा प्रस्ताव कारागृह प्रशासनाला दिला होता. परंतु कारागृहाच्यावतीने जुनी पुणे जिल्हा परिषद याठिकाणी आयोगाचे कामकाज सुरू असलेल्या जागी ढवळे यांना पुरेसा पोलिस बंदोबस्तात हजर करता येईल, असे कळविले असल्याचे अ‍ॅड. सातपुते यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय