शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड  येथे वृध्द महिलेचे ३० लाखांचे हिरे, सोन्याचे दागिने लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 20:30 IST

पिंपरीत ३० लाख ७५ हजारांचे हिरे व सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.

ठळक मुद्देचोरी, जबरी चोरीचे तीन प्रकार

पिंपरी : चोरीचा एक व जबरी चोरीचे दोन असे एकूण तीन गुन्हे पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांकडे दाखल झाले आहेत. पिंपरीत एका वृध्द महिलेचे तब्बल ३० लाख ७५ हजारांचे हिरे व सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. याप्रकरणी घरकाम करणाºया दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील अजमेरा येथील विना रोषा (वय ७४) यांचे ३० लाख ७५ हजारांचे हिºयांचे व सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी विना यांचा मुलगा राजीव अशोक रोषा (वय ४५, रा. अजमेरा, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सोनम संतोष कटारे (वय २९, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) व प्राजक्ता उर्फ प्रज्ञा संजय लोंढे (वय ३०, रा. यशवंतनगर, पिंपरी) यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.आरोपी सोनम कटारे व प्राजक्ता लोंढे या दोघीही विना रोषा यांच्याकडे घरकाम करतात. सोनम कटारे स्वयंपाक तर प्राजक्ता साफसफाईचे काम करते. विना रोषा सोमवारी (दि. ५) एका सोहळ्यानिमित्त बाहेर गेल्या होत्या. तेथून परत आल्यानंतर त्यांनी घरातील कपाटात त्यांचे हिºयाचे व सोन्याचे दागिने ठेवले. मंगळवारी (दि. ६) सकाळी नऊच्या दरम्यान आरोपी सोनम कटारे स्वयंपाक करण्यासाठी आली. दुपारी बाराच्या सुमारास ती स्वयंपाक करून गेली. त्यानंतर साफसफाई करण्यासाठी दुपारी दीडच्या सुमारास प्राजक्ता आली. त्यावेळी विना रोषा यांच्या घरातील नळाची दुरुस्ती करण्यासाठी प्लंबर आला होता. त्याने नळ दुरुस्ती केल्याने त्याला पैसे देण्यासाठी विना रोषा यांनी कपाट उघडले असता, कपाटातील दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी मुलगा राजीव यांना सांगितले. पोलीस उपनिरीक्षक अशोक निमगिरे तपास करीत आहेत.दुसºया प्रकरणात दुचाकीवरील तीन अनोळखी आरोपींनी मॉर्निंग वॉक करणाºया ज्येष्ठ नागरिकास लुटले आहे. जबरी चोरीचा पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी श्रीपाद नारायण एरंडे (वय ६२, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. फियार्दी एरंडे रविवारी (दि. ४) मोरवाडीत मॉर्निंग वॉकसाठी जात असताना दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात आरोपींनी त्यांना अडविले. लोखंडी रॉडने मारण्याची धमकी देऊन फियार्दी एरंडे यांच्या हातातील ३५ हजारांची ८ ग्रॅमची सोन्याची अंगठी जबरदस्तीने चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.तिसºया प्रकरणात दुचाकीस्वारास अडवून तीन अनोळखी इसमांनी रोकड तसेच मोबाइल लंपास केला. याप्रकरणी संतोष सदाशिव नढे (वय ३३, रा. मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फियार्दी नढे दि. ३१ जुलै रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास मोशीतील सीएनजी पंप रोडने दुचाकीवरून जात होते. त्यावेळी तीन अनोळखी आरोपींनी त्यांना अडविले. त्यांच्याकडील ५ हजार रुपये किमतीचा मोबाइल आणि १ हजार ७५० रुपये रोख असा एकूण ६ हजार ७५० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीThiefचोरGoldसोनं