उल्हासनगरात पोलीस चौकीसमोरील मेडिकलमध्ये चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 22:57 IST2021-10-02T22:53:09+5:302021-10-02T22:57:00+5:30
Crime News: कॅम्प नं-४ डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील गुरुकृपा मेडिकल मध्ये शुक्रवारी मध्यरात्री चोरी झाली असून चोरट्यानी एक लाखाचा ऐवज चोरून नेल्याचे उघड झाले.

उल्हासनगरात पोलीस चौकीसमोरील मेडिकलमध्ये चोरी
- सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-४ डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील गुरुकृपा मेडिकल मध्ये शुक्रवारी मध्यरात्री चोरी झाली असून चोरट्यानी एक लाखाचा ऐवज चोरून नेल्याचे उघड झाले. पोलीस चौकी समोरील मेडिकल मध्ये चोरी झाल्याने, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. (Theft in the medical in front of the police post in Ulhasnagar)
उल्हासनगर कॅम्प नं-४ डॉ आंबेडकर चौकात गुरुकृपा नावाचे मेडिकल आहे. शुक्रवारी मध्यरात्री रिक्षातून आलेल्या चोरट्यांनी रिक्षा मेडिकल समोर लावून रिक्षाच्या आड मेडिकलचे लोखंडी शटर तोडले. मेडिकल मधून रोख एक लाख रुपये घेऊन चोरटे रिक्षातून फरार झाले. याप्रकारने एकच खळबळ उडाली. महत्वाचे म्हणजे मेडिकल पोलीस चौकी समोर असल्याने, मेडिकल मध्ये चोरी झालीच कशी? असा प्रश्न विचारला जात आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस चोरांच्या मागावर आहेत.