पनवेल मधील जैन मंदिरात चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 10:58 IST2018-09-19T10:57:18+5:302018-09-19T10:58:26+5:30

पनवेल मधील जैन मंदिरात चोरी
वैभव गायकर, पनवेल : पनवेलमधील कापड बाजारातील पुरातन जैन मंदिरामध्ये आज पहाटे चोरी झाली. चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून सात दानपेट्या फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे.
चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्रीनंतर मंदिर फोडले. यावेळी चोरट्यांनी मूर्त्यांवरील चांदीचे छत्रही लंपास केले आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी दाखल झाले असून तपा सुरु आहे.