बीडमध्ये बंद घरात चोरीचा प्रयत्न; काहीच हाती न लागल्याने सामानाची केली तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 18:45 IST2018-07-20T18:44:49+5:302018-07-20T18:45:48+5:30
घर सोडून इतर ठिकाणी राहण्यासाठी गेलेल्या व्यक्तींच्या घरीच चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. परंतु हाती काहीच न लागल्याने सामानाची नासधूस करीत रिकाम्या हाताने परतले.

बीडमध्ये बंद घरात चोरीचा प्रयत्न; काहीच हाती न लागल्याने सामानाची केली तोडफोड
बीड : घर सोडून इतर ठिकाणी राहण्यासाठी गेलेल्या व्यक्तींच्या घरीच चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. परंतु हाती काहीच न लागल्याने सामानाची नासधूस करीत रिकाम्या हाताने परतले. या घटना बीड शहरातील भक्ती कन्स्ट्रक्शन परिसरात गुरुवारी रात्री घडल्या.
बबन सदाशिव खेडकर व लैलेश बारगजे यांचे भक्ती कन्स्ट्रक्शन परिसरात घर आहे. खेडकर हे नवीन घर घेतल्याने श्रीरामनगर भागात राहतात, तर बारगजे हे औरंगाबादला राहतात. दोघांचीही घरे बंद असतात. गुरुवारी रात्री याच बंद घरात चोरट्यांनी हातसफाई केली. मात्र, हाती काहीच न लागल्याने सामानाची नासधूस करुन ते रिकाम्या हाताने परतले.
हा प्रकार सकाळी शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर संबंधितांना माहिती देण्यात आली. तोपर्यंत शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे हे पथकासह घटनास्थळी पोहचले. पंचनामा करुन शिवाजीनगर ठाण्यात नोंद झाली आहे. मुद्देमाल चोरीला गेला नसला तरी एकाच रात्री दोन ठिकाणी प्रयत्न झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.