शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगरमध्ये चोरट्यांनी फोडले थेट न्यायाधीशांचेच घर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 19:19 IST

दिवाळीच्या सुट्टीला गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी चक्क न्यायधीशाचे घरावरच हात मारला...

ठळक मुद्देघरातील पासबुक व एफडी पावत्या देखील लांबविल्या

राजगुरुनगर : खेड सत्र न्यायालयाचे दिवाणी न्यायधीश महोदयांच्या निवासस्थानालाच चोरट्यांनी लक्ष केले आहे. दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) सुजितकुमार चंद्रकांत तायडे यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी २३ हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने व स्मार्ट टीव्ही असा एकूण ५५ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला आहे. खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तायडे हे करंडेवस्ती (सातकरस्थळ) येथे राहावयास असून ३ नोव्हेंबरला दिवाळीच्या सुट्टीसाठी आमगाव (जि. गोंदिया) येथे गेले होते. सोमवारी (दि.१२) त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कोरडे यांना घराचा कडी कोयंडा उचकटलेला दिसला. घरातील सर्वत्र वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. त्यांनी याची माहिती तायडे यांना दिल्यानंतर ते मंगळवारी (दि. १३) खेडला आले. घराची पाहणी केली असता वरीलप्रमाणे ऐवज चोरीस गेल्याची फिर्याद त्यांनी खेड पोलीस ठाण्यात दाखल केली. यावर चोरट्यांनी कहर करतानाच घरातील पासबुक व एफडी पावत्या देखील लांबविल्या आहेत. खेड पोलीस या चोरीप्रकरकणाचा तपास पोलीस हवालदार आर.डी. गवारे करत आहेत...........................दुष्काळी स्थितीमुळे चोरांच्या टोळ्या सक्रीय झाल्याचे जिल्ह्यात जाणवत आहे. दिवाळीत सुटीला बाहेरगावी जाताना नागरिकांनी शेजारी लोकाना कल्पना देऊन जावे. स्वत:च्या व्यवहारातील तपशील जाहीरपणे बोलू नये. अनावश्यक डामडौल किंवा दिमाखात वावर टाळावा असे आवाहन पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी याबाबत केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेKhedखेडkhed policeखेड पोलीसCourtन्यायालयtheftचोरीPoliceपोलिस